Download App

मुंबईत हिऱ्यांसह सोन्याची तस्करी; मुंबई कस्टमकडून 3 प्रवाशांना अटक, 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त

मुंबईत सोने आणि हिऱ्यांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई कस्टमने 3 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

Gold and Diamonds Smuggling Mumbai : मुंबईत सोने आणि हिऱ्यांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. काल रात्री मुंबई कस्टमने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 2.286 किलो सोने (Gold ) आणि हिरे जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे 1.58 कोटी रुपये (सोन्याचे मूल्य) आणि 1.54 कोटी रुपये हिऱ्यांची किंमत आहे. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Baramati : युग्रेंद्र पवार फिक्स आमदार तर सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री; बारामतीत झळकलं बॅनर

दुबईहून मुंबईत

पहिल्या प्रकरणात, दुबईहून मुंबईत येणाऱ्या एका संशयीत प्रवाशाला थांबवण्यात आलं आणि त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यात 24 कॅरेट सोन्याचे 12 बार (एकूण वजन 1400 ग्रॅम), अंदाजे किंमत 97,00,236 रुपये आहे. हे सोने प्रवाशाने पॅन्टच्या बेल्टजवळ लपवले होते. चौकशीदरम्यान प्रवाशानं सांगितलं की, हे कृत्य त्याच फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाच्या सांगण्यावरून केलं आहे. सहप्रवाशानेही आपल्या निवेदनात हे मान्य केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

आजपासून पावसाचे धुमशान! या जिल्ह्यांत जोरदार बरसणार; वाचा हवामानाचा अंदाज

प्रवशाकडे सोन्यासह हिरे

दुसऱ्या प्रकरणात, हाँगकाँगहून मुंबईकडे येणाऱ्या एका प्रवाशाला थांबवून त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये दोन 24 कॅरेट सोन्याच्या बांगड्या (एकूण वजन 886 ग्रॅम, किमतीचे 61,38,864 रुपये), रोलेक्स घड्याळ (13,70,520 रुपये किमतीचे) होते. तर 1,54,18,575 रुपये किमतीचे हिरे जप्त करण्यात आले. सोने, रोलेक्स घड्याळ प्रवाशाने परिधान केले होते, तर हिरे प्रवाशाने परिधान केलेल्या बनियानच्या आत एका विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवले होते. याप्रकरणी त्या प्रवाशाला अटकही करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास सुरू केला आहे.

follow us