Download App

Jalna Maratha Protest : ‘मराठ्यांचा गळा घोटणारेच जालन्यात’; मुख्यमंत्र्यांनी चव्हाण, ठाकरेंवरच फोडलं खापर

Jalna Maratha Protest : मराठा समाजाचा गळा घोटणारेचं लोकं जालन्यात गळा काढायला आले असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांसह(Ashok Chavan) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर(Udhav Thackeray) खापर फोडलं आहे. जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांवर लाठाचार्ज करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर विरोधकांनी तत्काळ जालन्यात धाव घेत जखमींची भेट घेतली. त्यानंतर विरोधकांकडून सत्ताधारी सरकारवर टीकेची तोफ डागण्यात आली होती. त्यानंतर बुलढाण्यात आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं आहे.

Attack : नमाज अदा करतेवेळी मशिदीवर दहशतवादी हल्ला; अंदाधुंद गोळीबारात 9 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) म्हणाले, जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठाचार्ज करण्यात आला, ही घटना अत्यंत दुर्देवी असून मला या घटनेचं दुख: झालं आहे. या घटनेची कारणे शोधण्याऐवजी घटनास्थळी काही लोकांनी आंदोलकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आंदोलकांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Sharad Pawar : मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल?; पवारांनी सांगितलं मास्टर प्लानिंग

तसेच ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला, तेच लोकं तिथं गळा काढायला आले होते, त्यामध्ये अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतरही अनेक नेते आले होते, देवेंद्र फडणवीस सरकारने 2014 साली मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं होतं, पण दुर्देवाने सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरणं गेलं, त्यावेळी महाविकास आघाडीचं आलं आणि आरक्षण गेलं होतं. ज्यावेळी मराठा आरक्षण रद्द झालं त्यावेळी अशोक चव्हाण हे उपसमितीतचे अध्यक्ष होते, त्यांनी काय केलं? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केला आहे.

Sai Tamhankar: सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर; पोस्ट शेअर करत म्हणाली…

तसेच मराठा समाजाचा मूक मोर्चा निघाला तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांचा अवमान करत मूका मोर्चा म्हणाले होते, कोणालाही त्रास होऊ नये, म्हणून मराठा समाजाचे महाराष्ट्रात एकूण 58 मूकमोर्चे निघाले होते. मराठा समाजाच्या आरक्षमाच्या मुद्द्यावर विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी यावेळी बोलताना केला आहे.

तसेच शांततेत असलेल्या आंदोलनात दगडफेक कोणी केली? हे पाहावं लागणार असून काही समाजकंटक जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, याची माहिती आमच्याकडे येतेयं, या विषयावर राजकीय पोळी भासण्याचा प्रयत्न करु नका, मराठा समाज संयमी आहे, आरक्षण रद्द झालं तरीही साडेतीन हजार तरुणांना नियुक्त्या देण्याचं काम मी केलं आहे, मी सर्वसामान्य गरीब मराठा आहे जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून मुख्यमंत्री जाणार, सरकार पडणार हे ऐकतोयं आता ते ज्योतिष संपले आहेत, अजितदादाही सोबत आलेत राज्यात, 215 आमदारांचं सरकार काम करतंय आता म्हणतात मुख्यमंत्री बदलणार आहे, विरोधकांना जसे मुघलांच्या घोड्याला पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसे विरोधकांना मी दिसत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us