Sharad Pawar : मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल?; पवारांनी सांगितलं मास्टर प्लानिंग

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 09 02T174420.525

जालना : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला असून, यावर ठोस असा तोडगा काढल्याशिवाय यातून मार्ग निघणार नसल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याबाबतचा मास्टर प्लान राज्य सरकारला दिला आहे. अशा पद्धतीने काम केल्यास या मुद्द्यावर कायमचा तोडगा निघू शकेल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. लाठीचार्ज करण्यात आलेल्या जखमींची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतून आदेश आल्यानंतरच बळाचा वापर केल्याचा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला.

मुंबईतून आदेश आल्यानंतरच बळाचा वापर; पवारांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

मराठा समाजाला कसं देता येईल आरक्षण?
मराठा समाजाला हवे असलेल्या आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. यातच पवारांनी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याचा मास्टर प्लान फोड करून सांगितला आहे. ते म्हणाले की, या आरक्षणाच्या मुद्द्यात मुख्यमंत्र्यांनी अधिक लक्ष घालून मार्ग काढण्याची गरज आहे.

तसेच, आरक्षणासाठी संसदेत काही बदल करावे लागतील. सध्या 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही असा नियम आहे. त्यामुळे देशात जनगणना करून 50 टक्क्यांची अट काढून टाकल्या आरक्षणासाठी सातत्याने होणाऱ्या घटनांवर कायमचा तोडगा काढला जाऊ शकतो.

आरक्षणाच्‍या प्रश्‍नावरुन गृहमंत्र्यांना बदनाम करण्‍याचा प्रयत्न; फडणवीसांच्या मदतीला विखे धावले…

याबाबत देशातील 28 पक्षांनी एकत्र येत वरील अट काढून टाकण्याची मागणी केली आहे. परंतु, करण्यात आलेल्या या मागणीवर अद्यापपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. तो जर झाला तर, जालन्यात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती टाळली जाऊ शकते. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारनं आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुर्देवाने तो निर्णय कोर्टात टिकाला नसल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले. सध्याच्या एसटी, एनटी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यावर तोडगा सोडवला जाऊ शकतो. त्यासाठी राष्ट्रवादी पूर्णपणे सहकार्य करले असा विश्वासही पवारांनी यावेळी दिला.

येत्या काळात संसदेत मांडणार मुद्दा
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस आणि कायम स्वरूपी तोडगा निघावा यासाठी आगामी काळात संसदेत हा मुद्दा प्रामुख्याने मांडणार असल्याचे पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube