Jameer Sheikh : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) गेल्या वर्षी बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांच्या एका कार्यक्रमात अहमदनगर (Ahmednagar) शहरात राहणारे जमीर शेख (Jameer Sheikh) यांनी त्यांच्या कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला होता.
या धर्मांतरानंतर त्यांचे नाव बदलून शिवराम आर्य असं करण्यात आले होते मात्र आता माहितीनुसार, शिवराम आर्य पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात प्रवेश करणार आहे. आर्थिक अडचणीचे कारण देत शिवराम आर्य संपूर्ण कुटुंबासह मुस्लिम धर्मात बकरा ईदच्या (Bakra Eid) दिवशी शहरातील मिर्झा लायब्ररी येथे सकाळी 11 वाजता प्रवेश करणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून घरी हिंदू परंपरेप्रमाणे धार्मिक विधीकरत असल्याने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमात जमीर शेख यांनी त्यांच्या कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला होता. यावेळी त्यांचा नाव बदलून शिवराम आर्य करण्यात आले होते तर पत्नी अंजुम शेखचे सीता आर्य आणि दोन मुलांना बलराम आणि कृष्णा असं करण्यात आले होते. मात्र आता शिवराम आर्य मुस्लिम धर्मात प्रवेश करणार आहे.
पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश का ?
शिवराम आर्य पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याचे पाठीमागचे कारण आर्थिक परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे. शिवराम आर्य यांना त्यांच्या आठ वर्षाची मुलगी अश्विनी हिची मेंदूची शस्त्रक्रिया करायची आहे. मात्र यासाठी हिंदू धर्मातील लोकांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने ते पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याची तयार करत आहे.
माहितीनुसार, शिवराम आर्यची मुलगी अश्विनी हिच्या मेंदूत गाठ आहे. या शस्त्रक्रियेसाठी साडेचार लाख रुपये खर्च येणार आहे मात्र त्यांच्याकडे इतके पैसे नसल्याने ते पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे शिवराम आर्य यांच्याकडे काही कागदपत्र हिंदू नावाप्रमाणे तर काही कागदपत्र मुस्लिम नावाप्रमाणे असल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.
मनसे लढवणार विधानसभा निवडणूक, महायुतीकडे करणार ‘इतक्या’ जागांची मागणी
जमीर शेख हे मूळ जालना जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या 40 वर्षांपासून ते अहमदनगर शहरात राहत आहे. त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका कार्यक्रमात संपूर्ण कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला होता. लोकांना नाव पुकारताना रामाच स्मरण व्हाव यासाठी त्यांनी शिवराम नाव धारण केला होता.