सरकारवर भरोसा नाही, आपला पक्ष अन् नेता कोणीही नाही; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange

Manoj Jarange

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त मराठा समाजाच्या लोकांनी पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीत उपस्थित राहावे असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले आहे. उपोषणाची सुरुवात झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाने यापुढे सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवणे बंद करावे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, मराठा समाजाने यापुढे सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवणे बंद करावे. आपला पक्ष, आपला नेता कोणीही नाही. या जगात फक्त जात आपली आहे. तीन वर्षांचा अखंड लढा आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. ही शेवटची फाईट आहे, त्यामुळे गाफील राहू नका दगाफटका होऊ शकतो असा इशारा जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला दिला. तर दुसरीकडे आंदोलनात नाटकबाजी करण्यासाठी कोणी येऊ नये असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

आंदोलनात नाटकबाजी करण्यासाठी कोणी येऊ नये. ठरवलेल्या नियमांनुसारच आंदोलन होईल. येथे हुल्लडबाजी चालणार नाही. आपल्याला तळमळ असल्यानेच मुद्दे घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले. ज्यांना केवळ आरडाओरड करायची आहे त्यांनी घरी गेले तरी चालेल आपण लढायला सक्षम असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी आरडाओरड किंवा हुल्लडबाजी करू नये. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले तर त्यांचे करिअर बरबाद होऊ शकते. ज्यांना वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायचे असेल त्यांनी स्वतंत्र आंदोलन उभे करावे. आंदोलनादरम्यान एकमेकांना मदत करा आणि पोलिसांनाही मदत करा, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले.

जरांगे फक्त प्यादा, मराठा आंदोलनामागे एकनाथ शिंदे; गुणरत्न सदावर्तेंचा मोठा दावा-

शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे तत्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावे. गावोगावी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असल्याचे सांगितले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, पण प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी अंतरवाली सराटीत यावे.ज्यांनी अर्ज केला पण अर्ज स्वीकारला गेला नाही, त्यांनीही येथे यावे. प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनीही अंतरवालीत यावे. कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनीही नोंदी घेऊन अंतरवालीत यावे.अंतरवाली सराटीत संबंधितांकडून अर्ज घेण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन करत संबंधितांचे काम होईपर्यंत अंतरवालीत थांबण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Exit mobile version