कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र द्या, आजपासून मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत उपोषण
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत येथे उपोषणाला बसणार आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत येथे उपोषणाला बसणार आहे. राज्यात न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदीचा डेटा प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 पासून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. 58 लाख कुणबी नोंदीचा डेटा प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी राज्यसरकारला 28 ऑगस्टची मुदत दिली होती. मात्र या त्यांच्या मागण्यांवर काही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी आजपासून आंदोलनाची घोषणा केली आहे.
तर दुसरीकडे राज्य सरकारकडून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, विखे पाटील रात्रीच संभाजीनगरात दाखल झाले असून रात्री राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या भेटीनंतर विखे पाटील आज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहे.
तर मला मुंबईकडे घेऊन जावं – मनोज जरांगे
आंदोलनापूर्वी 28 ऑगस्ट रोजी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाला मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरकारने दिलेल्या वेळेत मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घेतला नाही आणि मी उपोषण करता करता मेलो तर मला मराठ्यांनी मुंबईकडे घेऊन जावं असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर आजपासून अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
40 लाखांची लाच घेताना रायगडचे CGST अतिरिक्त आयुक्तासह तिघांना अटक