Video : पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, मनोज जरांगेंनी घेतली भेट, CMO ला फिरवला फोन

पुण्यातील डेक्कन परिसरात बाबा भिडे पुलाच्या जवळ नदीपात्रात मनोज जरंगे पाटील यांच्यासह हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलनावर बसले आहेत.

News Photo   2026 01 02T194359.282

Video : पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, मनोज जरांगेंनी घेतली भेट, CMO ला फिरवला फोन

पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा (Pune) वाढवण्याच्या मागणीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे स्वतः पुण्यात दाखल झाले आहेत.

पुण्यातील डेक्कन परिसरात बाबा भिडे पुलाच्या जवळ नदीपात्रात मनोज जरंगे पाटील यांच्यासह हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलनावर बसले आहेत. या आंदोलनादरम्यान मनोज जरंगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडीला फोन केल्याचं पाहायला मिळालं. जोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतोच, असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

संविधान धोक्यात असल्याच्या चर्चा पण कधीही गदा येणार नाही; साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः मनोज जरंगे पाटील पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील डेक्कन परिसरात बाबा भिडे पुलाच्या जवळ नदीपात्रात मनोज जरंगे पाटील यांच्यासह हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आंदोलनावर बसले आहेत. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडीला फोन केला.

त्याचबरोबर विखे पाटील यांच्याशीही थेट संपर्क साधत विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. प्रश्न सुटला नाही तर लक्षात ठेवा, निवडणुका तोंडावर आहेत. महापालिकेच्या निवडणुका आहेत,” असा थेट इशाराही मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतोच,असा ठाम निर्धार देखील मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन सुरु केले होते. ते आंदोलन आजही सुरुच आहे. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशीरा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळं अनेकजण या परीक्षेसाठी वयामुळं पात्र ठरणार नाहीत. त्यामुळं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत.

आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील थेट आंदोलनाच्या ठिकाणीच पोहोचल्याचं पाहायला मिळालं. या विद्यार्थ्यांचा प्रस्न तातडीने मार्गी लावावा असी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाला केली आहे. जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळं आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकार नेमकी का. भूमिका घेमार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version