Jayant Patil News : अद्याप जागावाटपाच फॉर्मुला ठरलेला नसल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट
जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुकांबाबत चर्चा झाली आहे. पक्षांतर्गत निवडणुका सुरु झाल्या असून सध्या काही जिल्ह्यांत या निवडणुका होणार असून नंतर इतर जिल्ह्यांच्या निवडणुका होणार असल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.
Road Accident : विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 5 जणांचा करुण अंत
तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात बुथ कमिटी स्थापन करण्याबाबत चर्चा झाली आहे. मागील निवडणुकीत ज्या ठिकाणी बुथ कमिटी नव्हती त्या ठिकाणा आमचा विजय झाला नसल्याने या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी बुथ कमिटीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
त्याचप्रमाणे पक्षातील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या असून राज्यात राष्ट्रवादीकडून शिबीरांचं आयोजन केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास…; राज्यपालांनी दिली कुलगुरूंना तंबी
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीची रणीनीती आखण्याबाबत चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय. येत्या 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगरमध्ये जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे.
कर्नाटकात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वज्रमूठ सभेचं राज्यभरात आयोजन केलं जाणार आहे. उन्हाळा असल्याने सभेच्या तारखा पुढे ढकलल्या असून जून महिन्यात वज्रमूठ सभा होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निवडणुका सुरु झाल्या असून त्यामध्ये कार्यकर्त्यांचं संघटन, समूह याची तपासणी करुनच नियुक्ती केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.