Download App

छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण… जयंत पाटील मंत्रिपदावर काय म्हणाले?

राजकीय परिस्थितीचा अभ्यास कमी असणाऱ्या पत्रकारांनी आपल्या सोयीने किंवा आपल्याला जे वाटत त्या बातम्या लावल्या आहेत.

Jayant Patil on Cabinet Participation : आज राष्ट्रावादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हा सोहळा राजभवनात सकाळी १० वाजता पार पडला. (Jayant Patil) या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते. दरम्यान, आज सकाळपासूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, रोहीत पवार हेही फडमवीसांच्या मंत्रिमंडळात सामिल होणार अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. अखेर त्यावर स्वत: जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राजकीय परिस्थितीचा अभ्यास कमी असणाऱ्या पत्रकारांनी आपल्या सोयीने किंवा आपल्याला जे वाटत त्या बातम्या लावल्या आहेत. त्यामुळे त्याला काही उत्तर दिलं पाहिजे असंही मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर, अशा बातम्या लावल्यानंतर तुमच्यावरचाच विश्वास कमी होतो असं म्हणत हा पोरखेळ आहे असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले. गेली काही दिवसांपासून जयंत पाटील हे भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार, मंत्रिमंडळात त्यांच्यासाठीच एक जागा खाली ठेवली आहे अशाही बातम्या येत असल्याने अनेकांना वाटलं खरच जयंत पाटील हे सत्तेत सहभागी होणार आहेत. मात्र, त्यांनी या विषयावर आज स्पष्टीकरण दिलं आहे.

जहाँ नहीं चैना ते कॅबिनेट; भुजबळांच्या कमबॅकचं हिडन सिक्रेट समीकरण अन् राजकारण नेमकं कसं?

follow us