अजित पवारांना शरद पवार राजकीयदृष्ट्या कधीच….संजय राऊतांचं खळबळजनक राजकीय विधान

अजित पवारांना शरद पवार राजकीयदृष्ट्या कधीच….संजय राऊतांचं खळबळजनक राजकीय विधान

Sanjay Raut on Sharad Pawar Ajit Pawar : शरद पवार आणि अजित पवार यांच्यासंदर्भात शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नात्यांसंदर्भात वक्तव्य करत (Pawar) राजकारणाबाबतही भूमिका मांडली आहे. अजित पवार यांना शरद पवार राजकीयदृष्ट्या कधीच माफ करणार नाही, असं मत संजय राऊत म्हणाले आहेत.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी होत असतात. कारण दोन्ही नेते अनेक संस्थांवर एकत्र काम करत आहेत. या संस्थांच्या कामांसाठी त्यांच्या भेटी होतात. तसंच, कौटुंबिक भेटीही त्यांच्या होत असतात. अमित शाह यांनी अजित पवार यांना हाताशी धरुन राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याचा त्रास शरद पवार यांना झाला आहे. यामुळे राजकीयदृष्ट्या शरद पवार अजित पवार यांना कधीच माफ करणार नाहीत. कुटुंबाची नाती वेगळी असतात आणि राजकीय संबंध वेगळे असतात, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

विरोधकांचे पक्ष फोडून त्यांना तुरुंगात टाकता; पाकिस्तानसमोर मात्र….राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घाव

अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याबद्दल संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलं. अजित पवार हे भाजपमध्ये सहभागी झाल्याशिवाय कधीही मुख्यमंत्री होणार नाही. त्यांना त्यासाठी आपला गट भाजपमध्ये विलीन करावा लागले. त्यानंतरच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, असे दावा राऊत यांनी केला. पवार यांचे मत संकटकाळात सरकारसोबत असावे, असं आहे. परंतु हे सरकार त्या योग्यतेचे नाही असंही राऊत म्हणाले आहेत.

आमचे २७ लोक मारले गेले. त्यानंतरही अमित शाह खुर्चीवर बसले आहेत. या हल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर काहीच दु:ख दिसत नाही. सरकारने बोलवलेल्या सर्व पक्षीय बैठकीत का आले नाही? याबाबत शरद पवार यांनी विचारणा केली. त्यांना मी सांगितलं की, ज्या सरकारच्या काळात अनेक नरसंहार झाले, त्या सरकारच्या बैठकीत मी गेलो नाही. मी गेलो असतो तर अमित शाह यांचा राजीनामा मागितला असता. मग सर्वांची अडचण झाली असती, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube