अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी

अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही क्षणांतच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Untitled Design 104

Untitled Design 104

Jitendra Shelke dies in an accident : समृद्धी महामार्गावर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. संभाजीनगरहून शिर्डीकडे जाणाऱ्या मार्गावर धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला कारने दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जितेंद्र शेळके हे आपल्या पत्नी आणि मुलासह कारने शिर्डीकडे निघाले होते. प्रवासादरम्यान धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरच्या त्यांना अंदाज आला नाही. परिणामी, त्यांच्या कारने कंटेनरच्या मागील भागावर अत्यंत वेगाने धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की कार सरळ कंटेनरखाली घुसली आणि वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे चिरडला गेला.

या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही क्षणांतच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली.

शेळके यांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र शेळके यांच्या पत्नी कारमध्ये बराच वेळ अडकून पडल्या होत्या. गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चिरडल्यामुळे त्यांना बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते. अखेर रेस्क्यू टीमने विशेष उपकरणांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार?; धुसफूस, पेच अन् सस्पेन्स…

या भीषण अपघातानंतर काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक हळूहळू पुर्वव्रत करण्यात आली. दरम्यान, जितेंद्र शेळके हे सामाजिक वर्तुळात परिचित व्यक्तिमत्व होते. ते अशोक खरात याचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. तसेच त्यांच्या मालकीच्या लॉन्स व्यवसायात देखील खरात याची भागीदारी असल्याची चर्चा होती. अलीकडील काळात अशोक खरात विविध गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला होता आणि त्याच्या अटकेनंतर शेळके यांच्यावर मानसिक तणाव वाढल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.

या अपघातामुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, शेळके यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर सुखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जड वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची देखील चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. कंटेनर रस्त्याच्या कडेला का उभा होता, त्यावर कोणतीही चेतावणी चिन्हे होती का, तसेच अपघातावेळी कारचा वेग किती होता, याबाबत तपास केला जात आहे. तसेच, महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील प्रश्न उपस्थित होत असून, अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक उपपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Exit mobile version