Maharashtra Weather : रत्नागिरी, धुळे, संभाजीनगरसह ‘या’ जिल्ह्यात आज पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज
Maharashtra Weather : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु होणाऱ्या मुसळधार पावसाने आता राज्यात विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या
Maharashtra Weather : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु होणाऱ्या मुसळधार पावसाने आता राज्यात विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे मात्र आता हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, पुढील काही दिवसात राज्यातील अनेक भागात धो धो पावसाला सुरुवात होणार आहे. तर आज रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तर विदर्भात सोमवारी (13 जुलै) मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पाऊस वादळी वाऱ्यासह होणार असल्याची देखील माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात (Maharashtra Weather) पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार असून राज्यात मान्सूनसाठी (Monsoon) अनुकूल वातावरण देखील तयार झाल्याने आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाची सुरुवात राज्यात होणार आहे.
शेवटच्या सामन्यातही पराभव, इंग्लंडने 4-0 ने मालिका जिंकली; भारताचा ‘क्लीन स्वीप’-
अनेक भागात थेट अतिवृष्टीचा इशारा
तर दुसरीकडे पूर्व आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होत असल्याने हवामान विभागाकडून नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच प्रशासन देखील हाय अलर्ट मोडवर तयार आहे. तर विश्रांतीनंतर पुढील एक दोन दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.