विजांच्या कडकडाटासह आज मुसळधार पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

IMD Rain Alert : राज्यातील काही शहरांमध्ये 22 मे रोजी पावसाने हजेरी लावल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. पुणे, मुंबईसह कोकणात शुक्रवारी

IMD Rain Alert

IMD Rain Alert : राज्यातील काही शहरांमध्ये 22 मे रोजी पावसाने हजेरी लावल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. पुणे, मुंबईसह कोकणात शुक्रवारी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. तर आज देखील राज्यातील काही भागात धो धो पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवार (23 मे) सातारा, सांगलीसह कोकणात पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (IMD Rain Alert), रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आज पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांचा कडकडाटासह पावसाची (Rain Alert) शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागात आज वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा रेड अलर्ट

तर दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर तीव्र उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता आहे. या भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.

मोठी बातमी! इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; IRGC दहशतवाद्याला अटक-

26 मे पासून मान्सूनची सुरुवात?

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 26 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने पुढील काही दिवसात मान्सून केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

follow us