Download App

धक्कादायक, साताऱ्यात जामिनासाठी न्यायाधीशांनीच घेतली 5 लाखांची लाच, गुन्हा दाखल

Satara District Court : न्यायव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. माहितीनुसार, एका प्रकरणात जामीन

  • Written By: Last Updated:

Satara District Court : न्यायव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. माहितीनुसार, एका प्रकरणात जामीन देण्यासाठी न्यायाधीशांनी (Satara District Court) 5 लाख रुपयांची लाच घेतली आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांवर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लाच घेणाऱ्या न्यायाधीशांना अटक करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयात (High Court) पत्र पाठवले असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लाच घेणाऱ्या न्यायाधीशांना अटक करण्यात येणार आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक (Anti-Corruption) विभागाने जिल्हा आणि सत्र न्यायाधिश धनंजय निकम (Dhananjay Nikam) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांना जामीन देण्यासाठी सातरा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी 5 लाख रुपयांची लाच मागितली. धनंजय निकम यांनी न्यायालयाच्या अवारातच लाच मागितली होती. लाचचे पैसे मध्यस्थींमार्फत घेण्यात आले होते.

परभणीत आंदोलनाला हिंसक वळण; जाळपोळ अन् वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून लाठीचार्ज

एका हॉटेलमध्ये लाचचे पैसे घेण्यात येत होते तेव्हा पोलिसांनी पैसे घेणाऱ्या मध्यस्थींला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो तेथेच पैसे टाकून पळून गेला. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर न्यायासाठी न्यायाधीश लाचेची मागणी करत असाल तर सर्वसामान्य लोक न्यायासाठी कोणाकडे जाणार असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित करण्यात येत आहे.

follow us