ठाकरेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, नितीन देशमुख पुन्हा ACB च्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

ठाकरेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, नितीन देशमुख पुन्हा ACB च्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

Nitin Deshmukh : ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhansabha Election) ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देशमुख यांची फाईल पुन्हा एकदा ओपन केली. अलीडकेच देशमुख यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-corruption Department) चौकशी केल्याची माहीती पुढं आली होती. अशातच त्यांच्या कुटुंबियांसदर्भातही एसीबीने (ACB) माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली.

मोठी बातमी! अहमदनगर शहरात उड्डाणपुलावर ट्रक उलटला 

अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांची महायुती सरकारवर कशाचीही तमा न बागळगता तुटून पडणारे नेते अशी ओळख आहे. अनेकदा त्यांनी महायुतीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. आता त्यांची अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा चौकशी सुरू केली.  देशमुख दहा वर्षे अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. याकाळात गैरप्रकार झाला आहे का, याचा छडा एसीबी लावणार आहे.

‘मी शरद पवारांना नेता मानतो पण नाईलाजाने…’, राजेंद्र शिंगणे देणार अजित पवारांना धक्का? 

देशमुख हे जिल्हा परिषदेचे सदस्य असताना विकासनिधी आणि भत्त्यांची माहिती मागवण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये देशमुखांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अमरावती एसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.  त्यानंतर गेल्या वर्षभरात परत त्यांची कोणताही चौकशी झाली नव्हती. मात्र आता हे प्रकरण पुन्हा एकदा वर आलं आहे. आता एसीबीने देशमुख यांच्या कुटुंबियांचीही वैयक्तिक माहिती गोळा करण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे.

लाचलुचपत विभागाने देशमुखांच्या मुलगा-मुलगी शिकत असलेल्या शाळेकडे माहिती मागितली आहे. देशमुख आपल्या मुलांची किती फी भरतात? या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांकडे एसीबीने चौकशीने केल्याची माहिती आहे.

गद्दारांबरोबर गेला नसल्याने चौकशीचा ससेमिरा…
दरम्यान, अमरावती एसीबीच्या चौकशीवर आता नितीन देशमुख यांनी संपत्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी गद्दारांसोबत न गेल्याने माझ्या पाठीमागे चौकशी लावण्यात आली. मात्र आता माझी चौकशी ही एखाद्या बंद रुममध्ये नाही तर सर्वांसमोर खुल्या पद्धतीने करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube