नांदेड : तेलंगणासारखे शेतकरी, दलित वर्गांसाठी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणून दाखवा, असे ओपन चॅलेंज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी दिले. तसेच तेलंगाणातील भारत राष्ट्र समिती (BRS) आता महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत देत तुम्ही शेतकऱ्यांसाठी हे करा अन्यथा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक लढवणार असल्याचे आजच्या नांदेडच्या लोहा येथील सभेत के. सी. राव यांनी जाहीर केले.
काही वर्षांपूर्वी एमआयएमचे ओवेसी यांनी नांदेड मार्गेच महाराष्ट्रात प्रवेश केला होता. पुढे झालेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने मोठे यश मिळवले होते. आता पुन्हा नांदेड मार्गे महाराष्ट्राच्या राजकारणात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे प्रवेश करत आहे. केवळ दोन महिन्यांतच के. सी. राव यांनी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे दुसरी सभा घेतली आहे. यावेळी शंकरअण्णा धोंडगे, हरिभाऊ राठोड, शिवराज धोंडगे, दिलीप धोंडगे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना २४ तास मोफत विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आम्हाला तेलंगणा राज्यात समाविष्ट करून घ्या, अशी मागणी केली होती. त्यामुळे आजच्या सभेत के. सी. राव काय बोलणार याकडे लक्ष लागले होते.
जाहिरातींसाठी उधळपट्टी करता तेच पैसे शेतकऱ्यांना.. ; जाहिरातबाजीवर अजितदादांचा संताप – Letsupp
के. सी. राव म्हणाले की, तेलंगणा राज्यासारखा विकास महाराष्ट्रात करा. आम्ही ज्याप्रमाणे तेलंगणा मॉडेल तयार केले आहे. ते मॉडेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागू करा. दलित समाजासाठीच्या योजनाही तुम्ही राबवा. मग माझे कामच राहणार नाही, असे म्हणत के. सी. राव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज दिले. जर फडणवीस यांनी केले नाही तर आम्ही वारंवार महाराष्ट्रात येणार आहे. वारंवार नांदेडला जाता सोलापूरला येणार नाही का? असा सवाल सोलापूरच्या शेतकऱ्यांनी केला आहे. मला नांदेडमध्ये दोनदा यावे लागले हे येथील लोकांचे प्रेम आहे. मला नांदेडमध्ये येऊ देऊ नये यासाठी गावात पार्ट्या होत असून बकरे कापले जात आहेत. माझ्या सभेसाठी लोकांना येऊ दिले जात नाही.