Manoj Jarange On Kailas Borade : महाशिवरात्रीच्या रात्री जालना जिल्ह्यातील आन्वा येथील कैलास बोराडे (Kailas Borade) या तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. माहितीनुसार, जुन्या वादातून कैलास बोराडे याला तापत्या लोखंडी रॉडने अमानुष चटके देण्यात आले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
तर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पत्रकार परिषद घेत कैलास बोराडे याचा नवीन व्हिडिओ समोर आणला आहे. या व्हिडिओमध्ये बोराडे हा अर्धनग्र अवस्थेत मंदिरात आल्याचे दिसून येत आहे. तसेच तो मद्यधुंद अवस्थेत मंदिरात आल्याचा आरोप या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, महापुरुषांची विटंबान करणाऱ्यांना आणि देव देवांची विटंबना करणाऱ्यांना मकोका लाववा पाहिजे. विधिमंडळाच्या या अधिवेशनात मकोकासारखा नवीन कायदा आणला गेला पाहिजे. तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर हा कायदा करा. संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
तर दुसरीकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका करत परळीत आमच्या एका व्यक्तीला दुसऱ्या जातीच्या व्यक्तीने खूप मारले. परंतु त्या प्रकरणाकडे आम्ही पाहिले नाही. कारण आम्हाला जातीवाद आणयचा नाही. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच हे व्हिडिओ भुजबळ यांच्याकडे देखील पाठवायचे आहे. त्यांनी व्यक्ती शोधून काढावा आणि कारवाई करावी. महान व्यक्ती (भुजबळ) संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी नाही बोलला, मात्र जातीवाद करतो. येवल्याच्या नेत्याला जातीच विष कलवायच आहे. कोणतेही कागद घेऊन इवळतो. भुजबळ जातीय विष पेरून अजित पवार सरकारला अडचणीत आणतो. तुझ वय काय झालं? बोलतो काय? चुकलं त्याला सजा झाली पाहिजे.
भुजबळ जन्मल्यापासून मराठा आरक्षणासाठी आडवा येतो. सगळ्या जातीच आरक्षण घेतो. कोणत्याही प्रकरणाला जातीचा रंग देतो. फडणवीस, शिंदे, अजित पवार यांना विनंती आहे. देव देवतांची विटंबना करणाऱ्याला शोधा, त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
तर दुसरीकडे कैलास बोराडेने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, व्हिडिओ माझा असून मी दारूचा प्रसाद म्हणून वापर करत होतो. मला अंगात आल्यासारखं झालेलं होतं. असं कैलास बोराडेने एका वृत्तवाहिनीला सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत दौंड यांनी महाशिवरात्रीच्या रात्री जालना जिल्ह्यातील आन्वा येथील कैलास बोराडे या तरूणाला बेदम मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच दोन्ही आरोपी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते. बोराडे हा महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी मंदिरात गेला होता. त्यावेळी जुन्या वादातून बोराडे या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.
आयुष्मान खुराना पहिल्यांदाच हरियाणवी पॉपमध्ये, ‘द हार्टब्रेक छोरा’ ईपी रिलीज
यावेळी लोखंडी रॉड तापवून त्याच्या शरीरावर चटके देण्यात आले. या अमानवीय प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे पारध पोलिसांनी या प्रकरणात नवनाथ आणि भागवत दौंडविरोधात गुन्हा दाखल केला.