Download App

निवडणुकीत सरकारी गाड्यातून पैसे आले; भाजपमध्ये प्रवेश करताच कैलास गोरंट्याल यांचा धक्कादायक खुलासा

Kailas Gorantyal : जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.

  • Written By: Last Updated:

Kailas Gorantyal : जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांनी शिवसेना (Shivsena) आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला . तसेच एका मुलाखतीमध्ये मोठा आणि धक्कादायक खुलासा करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारी गाड्यांमध्ये पैसे येत होते असा धक्कादायक खुलासा त्यांनी केल्याने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

या मुलाखतीमध्ये माजी आमदार आणि भाजप नेते कैलास गोरंट्याल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पैशांचा वापर खूप वाढत आहे. काही काही मतदारसंघात 100 कोटी तर काही मतदारसंघात सव्वाशे कोटी रुपये खर्च झाला असल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) यावर जशी  कारवाई करावी तशी कारवाई होताना दिसत नाही. पैसे वाटण्याचे क्लिप निवडणूक आयोगाकडे किती जणांनी दिले आहे मात्र त्यावर कारवाई काही होत नाही. निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली तर काहीही होऊ शकते.

या विधानसभा निवडणुकीत सरकारी गाड्यांमधून पैसे येत होते. एसटीमधून पैसे येत होते. मात्र आता याला पर्याय नाही. लोकांना जेव्हापर्यंत लक्ष्मीनारायण मिळत नाही तेव्हापर्यंत लोक मतदान करत नाही. अशी खंत देखील या मुलाखतीमध्ये बोलताना माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली. तसेच ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निश्चित केला असल्याची माहिती देखील माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.

तर जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी माझ्या मनधरणीचे प्रयत्न केले मात्र आता पाऊल उचल्याने मागे घेता येणार नाही असं मी त्यांना सांगितले असेही कैलास गोरंट्याल म्हणाले. तसेच काँग्रेस सोडण्याचा दुःख आहे मात्र पर्याय नाही कारण काँग्रेसमध्ये आता काहीच राहिले नाही असेही यावेळी कैलास गोरंट्याल म्हणाले.

VIDEO : उद्धव अन् राज ठाकरेंकडून दोनदा फोन; महादेव जानकरांचा धक्कादायक खुलासा, युतीचे संकेत…

आमदार अर्जुन खोतकरमध्ये मस्ती जास्त आहे

तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकरमध्ये मस्ती जास्त असल्याने ते दानवे साहेब, राजेश टोपे साहेब आणि मला टार्गेट करत असतो मात्र मी कधीही अर्जुन खोतकर किंवा दानवे साहेब, राजेश टोपे साहेब यांना टार्गेट करत नाही. असं देखील ते म्हणाले.

follow us