Kalaram Mandir : संयोगिताराजे भोसलेंचा अपमान करणाऱ्या महंतांवर कारवाई करा!

Sanyogitaraje Bhosale in Kalaram Mandir : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे भोसले या नाशिक येथील काळाराम मंदिरात आल्यानंतर त्यांना महंत सुधीरदास पुजारी यांनी वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करण्याचा आग्रह केला. हा संयोगीताराजे भोसले यांचा अपमान आहे. वेदोक्तवरून अपमान करणाऱ्या संबंधितावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी […]

Sachin Kharat Mahant Sudhirdas Kalaram Mandir

Sachin Kharat Mahant Sudhirdas Kalaram Mandir

Sanyogitaraje Bhosale in Kalaram Mandir : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे भोसले या नाशिक येथील काळाराम मंदिरात आल्यानंतर त्यांना महंत सुधीरदास पुजारी यांनी वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करण्याचा आग्रह केला. हा संयोगीताराजे भोसले यांचा अपमान आहे. वेदोक्तवरून अपमान करणाऱ्या संबंधितावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

छत्रपती शाहु महाराज यांच्या घराण्यातील संयोगिताराजे भोसले या नाशिक येथील काळाराम मंदिरात गेल्या होत्या. तेथे त्यांना सुद्धा वेदोक्तवरून अपमानित करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार अत्यंत निंदणीय आहे. संविधाननिर्माता, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाचे संविधान लिहून महिलांना समान अधिकार दिला आहे. मात्र, तरीसुद्धा ज्या मनुवाद्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचा सुद्धा वेदोक्त प्रकरणावरून अपमान केला होता. आता त्याच मनुवादाच्या हस्तकांनी परत एकदा राजर्षी शाहु महाराज यांच्या वारसाचा म्हणजेच संयोगिताराजे भोसले यांचा वेदोक्त वरून अपमान केला आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनीकेली आहे.

संजय राऊतांच्या जीभेला हाडच नाही… गिरीष महाजनांचा खोचक टोला – Letsupp

राज्यातील बहुजन जनता हे कदापिही सहन करणार नाही. तात्काळ संबंधितावर राज्य सरकारने कारवाई करावी आणि विशिष्ट समाजाला जे वर्षानुवर्ष हजारो वर्ष धार्मिक आरक्षण आहे हे आरक्षण तात्काळ रद्द करण्यासाठी संसदेत कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

(248) Nitin Gadkari : गडकरींच्या डोक्यात ‘उजनी’साठी खास प्लॅन | LetsUpp Marathi – YouTube

Exit mobile version