Kalyan-Dombivli Municipal Corporation : कल्याण- डोंबिवली महापालिकेत भाजपला मोठा धक्का बसला असून महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाने मनसेसोबत युती करत सत्ता स्थापन करणार आहे. शिवसेना शिंदे गट आणि मनसे एकत्र आल्याने आता कल्याण- डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि मनसे युतीचा महापौर होणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी 62 नगरसेवकांची आवश्यकता असून शिवसेना शिंदे गटाकडे सर्वात जास्त 53 नगरसेवक आहे तर भाजपकडे 50 नगरसेवक आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत. तर मनसेचे 5 नगरसेवक जिंकून आले आहेत. याचबरोबर काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक निवडून आला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत (Kalyan-Dombivli Municipal Corporation) सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरु होता. भाजपने अडीच वर्षांसाठी शिवसेनेकडे महापौर पदाची मागणी केली होती मात्र आता शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का देत मनसेसोबत युती करत कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे कल्याण महापालिका निवडणुकी दरम्यान भाजपचे 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते.
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि मनसेचे (MNS) नगरसेवक गट नोंदणीसाठी कोणक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात एकत्र पोहचल्याने महापौर शिवसेना शिंदे गट आणि मनसेचा होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळेच भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Ranpati Shivray Swari Agra : रणपति शिवराय स्वारी आग्रा चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षक पसंतीस
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक 2026 निकाल
शिवसेना शिंदे गट – 53
भाजप – 50
मनसे – 5
काँग्रेस – 2
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 1
