NCP in Karanatak Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काही महिन्यांपूर्वी काढून घेतला आहे. यानंतर पुन्हा आपल्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक राज्याची निवडणूक लढवण्याचे ठरवले. पण प्रत्यक्षात मात्र पवारांच्या या पक्षाचे निवडणुकीत पानिपत झालेले पहायला मिळाले. त्यांना अपेक्षा पेक्षाही कमी मतदान या निवडणुकीत झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने कर्नाटक राज्यातील 9 विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. राष्ट्रवादीच्या नऊ उमेदवारांपैकी 5 उमेदवारांना 200 मतांचा टप्पा सुद्धा गाठता आलेला नाही या ठिकाणी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून 2 मतदारसंघात अनुक्रमे केवळ 360 व 626 मते मिळाली आहेत.
मनपा, झेडपी निवडणुका 2024 मध्ये? ‘या’ कारणांमुळे भाजपला धडकी
अवघ्या 2 मतदारसंघात पाच अंकात मते मिळाली त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील निपाणी विधानसभा मतदारसंघात 66 हजार 056 इतकी मते प्राप्त झाली तर राणेबेन्नूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आर शंकर यांना 37 हजार 559 इतकी मते मिळाली आहेत. या मतदारसंघात मतविभाजनाचा लाभ भाजपला झाल्याचे स्पष्ट होत आहे.
या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. या निवडणुकीत चांगलेच मतदान मिळवून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवण्याचा शरद पवारांचा मानस असल्याचे बोलले जात होते. पण असे होऊ शकले नाही. या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा चांगलाच संघर्ष पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निपाणी येथे सभा झाली होती.
Sameer Wankhede : 18 कोटींवर डील ठरली, 50 लाखांचं टोकन; सीबीआयचे वानखेडेंवर गंभीर आरोप
त्या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणी सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असल्याचे बोलले होते. त्यावर जयंत पाटील यांनी भाजपने यांचा फौजदाराचा हवलदार केला असल्याचे बोलले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसला कर्नाटक राज्यातील 9 विधानसभा मतदारसंघात केवळ 1 लाख 04 हजार 807 इतकी नगण्य मते मिळाली आहेत. निपाणी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांना 66 हजार 056 इतकी मते प्राप्त झाली असून 35.25 टक्के मतांचे प्रमाण आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवाराने 73 हजार 348 इतक्या मतांनी विजय मिळवला असून कॉंग्रेसच्या उमेदवाराला 44 हजार 107 मते मिळाली त्यामुळे मतविभाजनाचा फायदा या मतदारसंघात भाजपला झाल्याचे स्पष्ट झाले आहे.