Download App

IIM मध्ये शिकला, मोठ्या पॅकेजची ऑफर धुडकावली; शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करत मुलगा सैन्यात अधिकारी

कारगिल युद्धात (Kargil War) शहीद झालेल्या वडिलांचे स्वप्न आता त्यांचा मुलगा पूर्ण करणार आहे. जूनमध्ये आयएमए डेहराडूनमधून उत्तीर्ण झाल्यानंतर ते आता सैन्यात अधिकारी होतील. पण, हा मार्ग तितकासा सोपा नव्हता. वडील शहीद झाले तेव्हा हा मुलगा 45 दिवसांचा होता. तर मोठा भाऊ अडीच वर्षांचा होता. आई सांगते, पहिला मुलगा अपयशी झाल्यानंतर धाकट्याने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. एसएसबी मुलाखतीत तब्बल नऊ वेळा अपयश आले. पण अखेर त्यांनी कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) उत्तीर्ण केली आणि आपलं ध्येय सैन्यात सेवा करणं हेच स्पप्न साकारल केलं. जाणून घेऊ, या जिद्दी शहीद पुत्राच्या संघर्षाची यशोगाथा. (Prajwal Samrit)

महाराष्ट्रातील पुलगाव येथील शहीद कृष्णाजी समरित (Krishnaji Samrit) यांचे कुटुंब आज खूप आनंदी आहे. कारण, त्यांचा मुलगा प्रज्वल हा त्यांच्या शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. कृष्णाजी समरित हे 1999 मध्ये कारगिल युद्धात शहीद झाले होते. ते शहीद झाले तेव्हा त्यांचा मोठा मुलगा फक्त अडीच वर्षांचा आणि धाकटा 45 दिवसांचा होता. आपल्या मुलाने सैन्यात अधिकारी व्हावे, असे वडिलांचे स्वप्न होतं. ते सुट्टीवर घरी आले की, अनेकदा हे स्वप्न आपल्या पत्नीकडे बोलून दाखवायचे.

त्यामुळे कारगील युध्दात वीरमरण आलेल्या आपल्या शहीद पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सविता यांनी आपल्या मुलाला देशसेवेवसाठी सैन्यात पाठवण्याचा निर्धार केला. आणि तसंच मुलाचं नीट संगोपण करून त्याला घडवं. मुलानं देखील शहीद वडिलांचं स्वप्न आणि आईचा निर्धार पूर्ण केला.

Manoj Kotak : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मिशन मुंबई</a>

मुलगा वडिलांचे स्वप्न पूर्ण करेल

कृष्णाजींचा मुलगा प्रज्वल जूनच्या पहिल्या आठवड्यात डेहराडूनमधील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मधून जेंटलमन कॅडेट म्हणून रुजू होणार आहे. प्रज्वल यांचा मोठा भाऊ कुणाल यांनी अभियांत्रिकीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रज्वल (२३) यांनी सैन्यदलाच्या परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अपार मेहनत केली आणि शेवटी त्यांच्या कष्टाचं चीज झालं. या परिक्षेत त्यांनी 63 व्या रॅक मिळवली. आपल्या वडिलांचे आपण सैन्यात जावं, हे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवलं प्रज्वल यांनी ठरवलं होतं आणि ते स्पप्न आता पूर्ण झाल्यानं कुटुंबाला खूप आनंद झाला असून घर आनंदानं उजळून निघालं आहे.

रस्ता सोपा नव्हता

मात्र, प्रज्वलसाठी हे एवढं सोपं नक्कीच नव्हतं. आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रज्वलला नऊ वेळा एसएसबी मुलाखतीला सामोरे जावे लागलं होतं. याविषयी बोलतांना तो म्हणतो की, हा माझा शेवटचा प्रयत्न होता. त्यामुळं मी बॅकअप प्लॅन केला. मी कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT) क्रॅक केली आणि त्यानंतर मला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) इंदूर आणि कोजिकोडकडून ऑफर मिळाल्या. मात्र, त्या सोडून मी सैन्यात जाण्याची तयारी केली. एसएसबीची मुलाखतीत नऊ वेळा अपयश मिळानंतर मी पुन्हा एकदा चांगली तयारी केली आणि अखेर यश मिळालं.

प्रज्वलची आई सविता (५२) सांगतात की कारगिल युद्धात त्यांनी आपला पती गमावला असला तरी, त्यांचा मुलगा आता त्यांच्या शहीत पतीचं स्वप्न पूर्ण करेल, असा आपला निर्धार होता. माझ्या पतीला माझ्या मोठ्या मुलाला आर्मी ऑफिसर बनवायचे होते. कुणालला हे जमलं नाही, मात्र, प्रज्वलने आपल्या वडिलांच स्वप्न पूर्ण करावं, अशी माझाी इच्छा होती. आणि त्यांने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.

दरम्यान आता 18 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रज्वल हे डेहराडूनला जात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पदभार स्वीकारतील. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags

follow us