Manoj Kotak : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मिशन मुंबई
Manoj Kotak on BMC Election : नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक पार पडली. त्यानंतर आता मुंबईमध्ये कार्यकारिणीची बैठक झाली. अशाच प्रकारे जिल्हा आणि मंडळ स्तरापर्यंत या कार्य समित्या होतील.
त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजप सरकारने केलेले काम मुंबईकरांपर्यंत पोहचवण्याचं काम करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप खासदार मनोज कोटक यांनी दिली ते पत्रकारांशी बोतल होते.
Jayant Patil यांची ईडीने चौकशी, प्रकरण नेमकं काय? जाणून घ्या…
त्याचबरोबर त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार जे कार्य करत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना लाभ पोहचवण्याच हे गतिमान सरकार आहे. त्याच्या अभिनंदनाचा ठराव देखील या कार्यकारिणीमध्ये करण्यात आला.
BJP विरोधात जनमत तयार झाल्यावर ‘लहरी राजा’ उटलेसुलटे निर्णय घेतो, नोटबंदीवरून राऊतांची टीका
तसेच मिशन 150 मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांना सेवा देण्यासाठी आता एकमेव भारतीय जनता पक्ष मैदानात आहे. त्यामुळे भाजपा च्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या महिना भरात जनसंपर्क कसा करायचा त्याची आखणी करण्यात आली. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका भाजप सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन लढणार आहे. अशी माहिती भाजप खासदार मनोज कोटक यांनी दिली.