BJP विरोधात जनमत तयार झाल्यावर ‘लहरी राजा’ उलटेसुलटे निर्णय घेतो, नोटबंदीवरून राऊतांची टीका

BJP विरोधात जनमत तयार झाल्यावर ‘लहरी राजा’ उलटेसुलटे निर्णय घेतो, नोटबंदीवरून राऊतांची टीका

Sanjay Raut’s criticism of Prime Minister Modi on demonetisation of Rs 2000 : शुक्रवारी भारताच्या रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. बँकेने नागरिकांनी आपल्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर (Modi Govt) कडाडून टीका होत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या नोटबंदीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या विरोधात काही निकाल गेला किंवा त्यांच्या विरोधात वातावरण तयार झालं की, त्याच्यावर पाणी टाकण्याचं काम असे उटलेसुलटे निर्णय घेऊन केले जातात, असा इतिहास आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणे हा असाच एकच निर्णय आहे. या देशाला एक लहरी राजा मिळाला आहे. लहरी राजा अशाच प्रकारचे निर्णय घेणार, असे गृहीत धरून आपण 2024 पर्यंत असेच दिवस ढकलणार आहोत, अशा शब्दात राऊतांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.

देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करुन धुव्वा उडवला. आणि कर्नाटकात कॉंग्रेसचं सरकार स्थापन केलं. भाजपच्या कर्नाटकातील पराभवावर बोलतांना राऊत म्हणाले की, कर्नाटकचा निकाल हा भाजपचा दारूण पराभव आहे. कर्नाटक हे अत्यंत प्रखर हिंदुत्ववादी राज्य आहे. अशा हिंदुत्ववादी राज्याने देखील बहुसंख्य हिंदू असलेल्या मतदारांनी नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपचा मोठा पराभव केला. असे पराभव भविष्यात तुमच्या वाट्याला येणार आहेत, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

Jitendra Aawhad : क्लस्टर म्हणजे काहींची घर भरण्याचं काम, गरिबांसाठी मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा

स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांवरूनही राऊतांनी भाजपला ललकारलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका घ्यायला सरकार विलंब का करतेय? मुंबई ठाण्यासह 14 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तुम्ही हिंमत का दाखवत नाहीत ? असा सवाल करत मोदी, अमित शहा कोणालाही प्रचाराला येऊ द्यात, इथे तंबू ठोकून बसा. कुठेही बसा पण निवडणुका घ्या. तेव्हा आम्ही दाखवू जनमत कोणाच्या बाजूने आहे, अशा शब्दात राऊतांनी थेट चॅलेंज दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स नागपुरात लावण्यात आले आहेत. याबाबत राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, त्यात चुकीचं काय आहे? लोकांच्या जर भावना असतील, त्यांचं प्रेम तिथे बॅनर मधून दाखवत असतील तर त्यात चुकीचं वाटत नाही.

28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्घाटन करू नये, अशी भूमिका घेतली आहे. यावरही राऊतांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, नव्या संसदेचे लोकार्पण हे राष्ट्रपतींकडून व्हावं अशी जर मागणी होत असेल तर शिवसेना त्या मागणीला पाठिंबा देईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube