Download App

आमचा पक्ष सांगेल तिथं जाणार, फडणवीसांचा राऊतांना उपरोधिक टोला

आमचा पक्ष सांगेन तिथं मी जाणार, असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस आज कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचारासाठी बेळगावात यावं, असं आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलं होतं. त्यावर फडणवीसांनी राऊतांना उपरोधिक टोला लगावला आहे.

Mann Ki Baat च्या 100 भागाच्या निमित्तानं येणार ‘हे’ खास नाणं

फडणवीस म्हणाले, कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यपद्धतीवर कर्नाटकातील जनता समाधान असून जनता भाजपला मोठ्या मताधिक्क्याने निवडून देणार असल्याचा विश्वास फडणवीसांना व्यक्त केला आहे.

Sujay Vikhe : आमची कोंडी करणारा अजून जन्माला यायचाय; सुजय विखेंचा लंके-औटींना टोला

पत्रकार परिषदेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना बेळगावात येऊन प्रचार करण्याचं खुलं आव्हान दिलं होतं. यावेळी राऊतांकडून टिकाही करण्यात आली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आमचा पक्ष सांगेन तिथं मी जाणार असून याआधीही कर्नाटकच्या प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्षांनी जिथं उमेदवार आहेत तिथं त्यांचा प्रचार केला असल्याचं सांगितलं आहे.

‘Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan’ ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; पाच दिवसांत कमाईचा ‘हा’ टप्पा केला पार

येत्या 10 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. कर्नाटकात भाजप सत्तेत असून मध्यांतरी सीमावादावरुन चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता.

त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी कर्नाटकात गेल्याने संजय राऊतांकडून तुम्ही बेळगावात प्रचारसाठी या, असं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर माझा पक्ष सांगेल तिथं जाणार असल्याचं फडणवीसांनी राऊतांना ठणकावून सांगितलं आहे.

Tags

follow us