Karuna Sharma :मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना वांद्रे न्यायालयाने (Bandra court) घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना पोटगी द्यावी, असे निर्देश दिले. कोर्टाच्या या निकालानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे पुत्र सिशिव मुंडे (Seeshiv Munde) यांनी वडील धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली. वडील आईसोबत कठोर असले तरी आमच्यासोबत चांगलेच आहे, असं त्याने लिहिलं. तर आईच आम्हा सर्वांचा छळ करते, असा आरोप सिशिवने केला. यावर आता करुणा शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
कर्मचाऱ्यांना सरकारचं गिफ्ट! ईपीएफओच्या बैठकीत होणार पीएफच्या व्याज वाढीचा निर्णय
सिशिव याने करुणा शर्मांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मुलगा जे म्हणाला आहे, ते खरं आहे. धनंजय मुंडे यांचे माझ्या मुलांसोबत चांगले नाते होते. ते खूप चांगले वागले होते. त्यांच्यामध्ये कोणतेही वाद नाही. आजची पत्रकार परिषद न्यायालयाच्या निर्णयावर होती. त्यावर मी बोलले आहे. मात्र, आता माझ्या मुला-बाळांवरही दबाव येत आहे, तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
जेव्हा मी मीडियाशी बोलत होते, तेव्हा माझ्या नवऱ्याचा सातत्याने मुलाला फोन येत होता. माझ्या मुलांना आणि मुलांच्या वडिलांना वाटते की, मी मीडियात बोलू नये. किंवा कोर्टात जाऊ नये. आमच्या मुलांना हे वाद नको आहेत. ते म्हणतात, तुम्ही कोर्ट केस संपवून टाका, असं करुणा शर्मा म्हणाल्या.
हर्षित राणासाठी ड्रीम डेब्यू, पहिल्याच सामन्यात आपल्या नावावर केला अनोखा ‘विक्रम’!
माझा नवरा आणि मी मिळून आमच्या मुलांना छळतोय, हे खरं आहे. हे मी मान्य करते. माझी मुले माझ्यासोबत राहतात. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही याची कल्पना आहे. त्यांच्यावर सतत दबाव असतो. त्याच्यावर पोस्ट टाकण्यासाठी दबाव आहे. तो खूप लहान आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून सहन करतोय. त्यांचा खरोखर छळ सुरू आहे. ज्या माझ्या वाईट गोष्टी आहेत, त्या मी मान्य करतेच, असं सांगत माझ्या मुलांवर धनंजय मुंडेंचा दबवाव आहे, असंही करूणा शर्मा यांनी सांगितलं.
धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा भरत आला – तृप्ती देसाई
आजवर धनंजय मुंडेंनी राजकीय बळाचा आणि पदाचा वापर करून अनेक गैरकृत्य केली आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा आता भरत आलेला आहे. मला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना विचारायच आहे- धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. पत्नीचा छळ करणारा पती तुमच्या मंत्रिमंडळात आहे. त्याला तुम्ही मंत्रिमंडळात ठेवणार आहात का? असा सवाल करत फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.