Download App

Kasba Chinchwad Bypoll : आमदार तांबे म्हणाले, निवडणुकीचा ‘तसा’ परिणाम होणार नाही

kasba Chinchwad Bypoll : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीतील मतदानाला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत नेते मंडळींनी जोरदार प्रचार केला. भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा परिणाम राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणावर होणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.

आमदार तांबे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, की निवडणुकीशी माझी काही भुमिका असण्याचे कारण नाही. काही भूमिका असली तरी मी भुमिका सांगू शकत नाही. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीचा परिणाम राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणावर होईल असे मला वाटत नाही.

हे वाचा : Kasba Chinchwad By Poll : फडणवीस म्हणाले, लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे

दरम्यान कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत. यातच कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र येथे सत्तांतरासाठी महाविकास आघाडीने देखील मोठा जोर लावला आहे.

Kasba By Election: पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, हा रडीचा डाव

कसब्यातून भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे त्यांच्या विरोधात आहे. तर चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे. आज या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर 2 मार्च रोजी निकाल जाहीर केले जाणार आहे. यामुळे या निवडणुकीत कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे राजकीय वर्तुळासह जनतेचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us