Kasba – Chinchwad By Poll : फडणवीस म्हणाले… लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे

Kasba – Chinchwad By Poll : फडणवीस म्हणाले… लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे

पुणे : कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी नेतेमंडळींनी जोरदार प्रचार देखील केला. भाजपा व महाविकास आघाडीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. यातच आज मतदान प्रक्रिया पार पडत असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना महत्वाचे आवाहन केले आहे. लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे म्हणतच फडणवीसांनी मतदारांना मतदानाचे आवाहन यामाध्यमातून केले आहे.

कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक तर चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. मतदानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे. मतदानाची टक्केवारी वाढवी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केले आहे.

फडणीवस म्हणाले, कसबा आणि चिंचवडवासियांनो, तुम्ही मतदान केले असेलच! नसेल केले तर मोठ्या संख्येने मतदान करा, आपले कुटुंबीय,मित्रपरिवार यांनाही मतदान करायला सांगा. लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे असते… लाखो नागरिकांचे भवितव्य घडविणारे असते… लोकशाही प्रक्रियेला आणखी भक्कम करणारे असते… अशा आशयाचे ट्विट फडणवीसांनी केले आहे. ट्विटद्वारे मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे.

भाजप उमेदवार हेमंत रासनेंनी बजावला मतदानाचा हक्क

दरम्यान कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत. यातच कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र येथे सत्तांतरासाठी महाविकास आघाडीने देखील मोठा जोर लावला आहे.

चिंचवड : जगताप, कलाटे समर्थक भिडले! डोक्यात घालायला दगडच उचलला

कसब्यातून भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे त्यांच्या विरोधात आहे. तर चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे. आज या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर 2 मार्च रोजी निकाल जाहीर केले जाणार आहे. यामुळे या निवडणुकीत कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे राजकीय वर्तुळासह जनतेचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube