चिंचवड : जगताप, कलाटे समर्थक भिडले ! डोक्यात घालायला दगडच उचलला

चिंचवड : जगताप, कलाटे समर्थक भिडले ! डोक्यात घालायला दगडच उचलला

पुणे : चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या वेळी भाजप उमेदवार अश्विनी जगताप व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे समर्थक आपसात भिडले आहेत. (By Election) चिंचवडमध्ये जगताप समर्थक गणेश जगताप (Ganesh Jagtap) आणि कलाटे समर्थक माजी नगरसेवक सागर आंघोळकर (Sagar Angholkar)यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी भांडणात एकमेकांना मारण्यासाठी दगड उचलल्याचे पाहायला मिळाले. परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळं परिस्थिती निवळल्याचं दिसून येतंय. दोघांनाही पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलंय.

मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथील मतदान केंद्राबाहेर माजी नगरसेवक आंघोळकर आणि राहुल कलाटे समर्थकामध्ये मतदार केंद्रावर थांबण्यावरून बाचाबाची झाली.सुरुवातीला पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र कलाटे समर्थक कमालीचे आक्रमक झाले होते. यानंतर थोड्याच वेळात दोघांमध्ये झटापट झाली.

हेही वाचा
भाजप उमेदवार हेमंत रासनेंनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदान केलेल्या मतदान केंद्रावरच वाद झाल्यानं खळबळ उडाली आहे. मतदान केंद्रावर थांबण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं हा वाद सध्या तरी निवळला. मात्र, याचा परिणाम परिसरातील मतदानावर होताना दिसून आला. काही वेळ मतदान केंद्रावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्यानंतर हळूहळू मतदार मतदान करण्यासाठी येत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube