Download App

कशाबशा 100 जागा मिळविण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवताहेत, भाजपचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

आम्ही कोणाला विचारायला जात नाही म्हणून डरकाळ्या फोडणारे ठाकरे आज दिल्लीत जाऊन दोन जार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत आहेत.

  • Written By: Last Updated:

Keshav Upadhyay on Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान संबंधित नेत्यांची जागावाटपा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. . यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी (Keshav Upadhyay) ठाकरेंवर जोरदार टीका केली.

फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर…; मनोज जरांगेंची सदाभाऊ खोतांवर तुफान फटकेबाजी 

केशव उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, स्वाभिमान गमावणे ह्याचा सोपा अर्थ बघायचा असेल तर लोकांनी आजच्या उद्धव ठाकरेंकडे आणि शिवसेनेच्या उबाठाकडे बघावं. 25 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत वैचारिक तत्वांवर आधारलेली युती, जी प्रत्यक्ष स्व. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या महाराष्ट्रातील धुरिणांनी कॉंग्रेसला काँग्रेसला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी अस्तित्वात आणली होती. भाजपासह लढतांना 125 हून अधिक जागांवर लढणारी शिवसेना म्हणजे आताची उबाठा कशाबशा 100 जागा मिळविण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे, अशी बोचरी टीका उपाध्येंनी केली.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे आणि देणारे अधिकारी आले गोत्यात ? बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी 

त्यांनी पुढं लिहिलं की, आम्ही दिल्लीपुढे झुकत नाही, आमचा स्वाभिमान झुलवत नाही, आम्ही कोणाला विचारायला जात नाही म्हणून डरकाळ्या फोडणारे ठाकरे आज दिल्लीत जाऊन दोन जार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत आहेत. ज्या अमित शहांनी तुलना उद्धव ठाकरेंनी अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपचे अध्यक्ष असतानाही मातोश्रीवर चर्चेसाठी आले व योग्य तो सन्मान दिला. पण, वैचारिक भिकेचे डोहोळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते पटलं नाही. ज्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजपसोबतची युती तोडली, ती सत्ता तर गेलीच, पक्षही गेलो. चुकून आणि दुर्देवाने मिळालेलं मुख्यमंत्रीपदही गेलं.

आता ज्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्रीपद स्विकारले असे उद्धव ठाकरे सांगत होते, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजे महाविकास आघाडी आज तुमचं नावंही मुख्यमंत्रीपदासाठी घेत नाहीये. एकेकाळी महाराष्ट्रात ज्यांच्या नेतृत्वात निवडणुकाल लढवल्या जायच्या, जे जागावाटप करण्याचे सुत्र ठरवायचे, तेच आज जागांचा जोगवा मागत फिरत आहे, अशी टीका केशव उपाध्येंनी केली.

दरम्यान, उपाध्येंनी केलेल्या टीकेला आता ठाकरे गट काय प्रतिक्रिया देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us