Sharad Pawar: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा

Sharad Pawar: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या  तयारीला लागा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना दिल्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालीमुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडली.

या बैठकीमध्ये संघटना वाढ, विधानपरिषदेच्या निवडणूका, चिंचवड व कसबा पोटनिवडणुक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय नीती असावी याबाबत चर्चा झाली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना शरद पवारांनी केलीय. राष्ट्रवादीचे जिथे आमदार आहेत त्याशिवाय दुसऱ्या क्रमांकावर आहेत तिथे लक्ष द्या. राष्ट्रवादीचे जास्तीजास्त आमदार निवडूण आणण्यावर लक्ष केंद्रीत करा, अशाही सुचना दिल्या आहेत.

नेत्यांनी राज्यात दौरे केले पाहिजे, फिरले पाहिजे, कार्यकर्यांशी, जनतेशी संवाद वाढवायला हवा. येत्या निवडणुकीत तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करायला हवा, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

या बैठकीला अनिल देशमुख, एकनाथ खडसे, सुनील तटकरे बाळासाहेब पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, फौजिया खान, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube