हत्येच्या आदल्या दिवशी कॅफेत भेटले, कट रचला अन्…, सिया – चेतनचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Siya Goyal :  पुण्यातील व्यवसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असल्याने संपूर्ण राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Siya Goyal

Siya Goyal

Siya Goyal :  पुण्यातील व्यवसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असल्याने संपूर्ण राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. तर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी एका कॅफेमध्ये बसून काहीतरी प्लन करताना दिसत आहे. सोशल मीडियावरच्या दाव्यानुसार, व्हायरल व्हिडिओ हत्येच्या आदल्या दिवशीचा असून सिया आणि चेतन कॅफेमध्ये बसून हत्येचा कट रचत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओ 17 जूनचा असून सिया आणि चेतन (Chetan Choudhary) पुण्यातील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये सायंकाळी 4.30 च्या दरम्यान भेटले होते. कॅफेमध्ये जवळपास एक तास चर्चा केल्यानंतर ते दोघे 5.30 च्या सुमारास बाहेर आले. या एका तासात 18 जून रोजी केतनचा (Ketan Agarwal) काटा कसा काढायचा याविषयी त्यांनी चर्चा केली असल्याचा अंदाज आहे. याच कॅफेमध्ये 18 जून रोजी केतनची हत्या करण्यासाठी प्लॅन ए आणि प्लॅन बी त्यांनी तयार केला असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला असून सिया गोयलने (Siya Goyal) केतनच्या हत्येपूर्वी यूट्यूबर लोहगड किल्ल्याचे (Lohgarh Fort) व्हिडिओ सर्च करत त्या ठिकाणाची माहिती घेत चेतनला दिली होती. समोर आलेल्या या धक्कादायक माहितीनंतर आता पोलीस दोन्ही आरोपींमधील संभाषण, चॅट रेकॉर्ड, मोबाईल फोन, इंटरनेट सर्च हिस्ट्रीची माहिती घेत आहे.

मी वाघ आहे.., तुझे सगळे धंदे बाहेर काढणार, 2029 ला आमदार होऊ देणार नाही; बजरंग सोनवणे धनंजय मुंडेंवर भडकले –

प्रकरण काय?

व्यावसायिक केतन अग्रवाल आणि सिया गोयल पुढील महिन्यात लग्न करणार होते मात्र सियाचा चेतन चौधरीसबोत प्रेम प्रकरण सुरु असल्याने सियाला केतनसोबत लग्न मान्य नव्हते. त्यामुळे केतनचा काटा काढण्यासाठी सिया आणि चेतनने कट रचला आणि लोहगडच्या किल्ल्यावर 18 जून रोजी केतनला दरीत ढकलून त्यांची हत्या केली. सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करत आरोपींना अटक केली.

Exit mobile version