विष देऊन हत्या कशी करावी? केतनच्या हत्येपूर्वी Youtube, Google वर सियानं शोधले हत्या करण्याचे विविध मार्ग

Siya Goyal : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु असून या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुसाले होत

Siya Goyal

Siya Goyal

Siya Goyal : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु असून या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुसाले होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. तर आता या प्रकरणात आणकी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने केतनची हत्या करण्यापूर्वी इंटरनेटवर हत्याचे विविध मार्ग सर्च केले होते. तिने यूट्यूब आणि गुगलवर एखाद्या व्यक्तीची विष देऊन हत्या कशी करावी? अपघातसारखी घटना कशी घडवता येईल याबाबत यूट्यूब (Youtube) आणि गूगलवरुन (Google) माहिती घेतली होती अशी माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया (Siya Goyal) आणि चेतनने केतनची (Ketan Agarwal) हत्या करण्यापूर्वी अनेक वेळा संपूर्ण कटाची रिहर्सल देखील केली होती. तसेच सुरुवातीला सिया आणि चेतनने केतनला विष देऊन संपवण्याचा विचार केला होता मात्र यानंतर त्यांनी लोहगड किल्ल्यावरुन केतनला दरीत ढकलण्याचा प्लॅन केला. या प्लॅननुसार दोन्ही आरोपींनी 18 जून सकाळी 10.30 च्या सुमारास केतनला पाठीमागून धक्का देत दरीत ढकलून दिले.

सुरुवातीला या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला (Chetan Chaudhary) अटक केली. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून तपास सुरु आहे.

नितीन गडकरींना धक्का; मंत्रालयात होणार फेरबदल; PM मोदी घेणार मोठा निर्णय?-

लग्न मान्य नसल्याने हत्या

केतनला टक्कल असल्याने तो केसाचा विग वापरत होता तसेच बोलताना अडखळत होता आणि सियाचा चेतन चौधरीसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याने सियाला केतनसोबत लग्न मान्य नव्हते म्हणून तिने केतनचा काटा काढण्याचा प्लॅन केला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणात सखोल तपासासाठी एसआयटीची देखील राज्य सरकारकडून स्थापना करण्यात आली आहे. माहितीनुसार, सिया आणि चेतन दरम्यान गेल्या सहा महिन्यात 2 हजारपेक्षा जास्त काॅल्स झाले होते. पोलिसांनी याबाबत देखील माहिती घेतली असून दोघांमध्ये झालेल्या चॅट, काॅल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी पोलिसांकडून सुरु आहे.

Exit mobile version