चंद्रपूर : चंद्रपूर येथील काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्याचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला करत मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे चिमुरचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया (Kirtikumar Bhangdiya) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यासह, त्यांच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरूद्ध कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिला या पती साईनाथ बुटकेसह चिमूर येथे राहत आहेत.
चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस या पदावर साईनाथ बुटके यांचा मोठा भाऊ गजानन बुटके हे आहेत. ११ मार्च रोजी सायंकळी सात-साडेसातच्या सुमारास भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे काही कार्यकर्त्यांना घेऊन बुटके यांच्या घरासमोर आले तसेच बुटके यांना शिवीगाळ करू लागले. जबरदस्तीने बुटके यांच्या घरात घुसून मारहाण केली. मारहाण करतच त्यांना घराबाहेर नेत असताना विनयभंग केला, असा आरोप पिडीत महिलेने केला आहे.
भाजपचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या कार्यकर्त्यांनी साईनाथ बुटके यांच्यासह पीडित महिला आणि त्यांच्या दोन लहान मुलांना देखील मारहाण केली आहे, असे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.