सिंधुदुर्गचे जिल्हाप्रमुखपद काढले… Vaibhav Naik म्हणतात…
सिंधुदुर्ग : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Group) गटाचे निष्ठावान तसेच आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाप्रमुखपद काढून घेण्यात आल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. वैभव नाईक यांना हटवल्यानंतर तातडीने तीन जणांची नेमणूक करण्यात आली आहे.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून हटवून तिथे संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते अशा तीन जणांची नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
Ajit Pawar : चिंचवडला कलाटे अन् काटे यांच्यात एकवाक्यता करायला कमी पडलो!
मात्र, नवीन तीन जणांच्या नेमणुकीबद्दल ठाकरे गटात अंतर्गत मतभेद असून नवीन तिघेही राणे समर्थक असल्याने नाराजी आहे. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून राणे समर्थकांना पदे का दिली जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, याबाबत वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझ्यावर पक्षाने जिल्ह्याबाहेर राज्याची जबाबदारी दिली आहे. त्या कामासाठी मला वेळ मिळावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी कमी करण्यात आली आहे. बाकी पदावरून काढले किंवा कमी केले असे काही नाही. पक्षाने नवीन जबाबदारी दिली आहे.