Ajit Pawar : चिंचवडला कलाटे अन् काटे यांच्यात एकवाक्यता करायला कमी पडलो!
पुणे : कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदारांच्या मनामध्ये साधारणपणे काय आहे. याची आम्ही थोडीशी चाचणी करतोच. अनेक निवडणुकीमध्ये बघितले तसेच नुकतेच पार पडलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत सर्व्हे केलेला होता. दोन्ही जागांवर सर्व्हेत महाविकास आघाडीसाठी पॉझिटिव सर्व्हे होता. पण चिंचवडच्या जागेवर राहुल कलाटे (Rahul Kalate) आणि विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांच्यात एक वाक्यात करायला आम्ही कमी पडलो. कारण या दोघांची मतं ही निवड झालेल्या उमेदवारांपेक्षा १० हजारांनी जास्त होती, अशी खंत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले की, इतर सरकारमधल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सभा घेऊन निवडणूक केलेली आणि बाकीची पण यंत्रणा कामाला लावलेली आम्ही कुठे पाहिलेली नव्हती, असे पोलीस खात्याचे अधिकारी, रेल्वे खात्याचे अधिकारी तसेच वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी यांनी आम्हाला सांगितले. इतके राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरलेले होते. आमच्या सर्व्हेत कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्हाला पॉझिटिव्ह दाखवत होत्या. मात्र, चिंचवडमध्ये आम्हाला दोन उमेदवारांनी तिकिट मागितले. आम्ही एकाला तिकिट दिले. पण दुसऱ्याने बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. तिथे जर राहुल कलाटे आणि नाना काटे यांच्यात एकवाक्यता करण्यास आम्ही यशस्वी झालो असतो तर कसब्या प्रमाण चिंचवडला देखील महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला असता.
Devendra Fadanvis : पाणी फाउंडेशनमुळे शेतकऱ्यांनी ‘ती हनुमान उडी मारली’
शेवटी जनतेचा कौल हा अंतिम असतो. या पोटनिवडणुकीत आपण कुठे कमी पडलो. ते पुढे दुरुस्त करण्याची गरज आहे. ती खबरदारी यापुढे घेऊन महाविकास आघाडीतील मतांची विभागणी होता कामा नये यासाठी काळजी घ्यावी लागेल. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांशी चर्चा करून राज्यातील वेगवेगळ्या विभागामध्ये येणाऱ्या काळात सभा देखील होणार आहेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.