Devendra Fadanvis : पाणी फाउंडेशनमुळे शेतकऱ्यांनी ‘ती हनुमान उडी मारली’

Devendra Fadanvis : पाणी फाउंडेशनमुळे शेतकऱ्यांनी ‘ती हनुमान उडी मारली’

पुणे : वॉटर कपने आमच्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना वेडं केले. त्यात एकेक गावाने काय मेहनत केली आहे. ती जर बघितली तर मला असं वाटतं की रामायणामध्ये हनुमानाला लंकेला जायचं होतं. पण समुद्रापलीकडे त्याला उडी मारता येईल असं वाटत नव्हतं. त्यावेळी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिल्याबरोबर हनुमानाने जी उडी मारली ते थेट लंकेमध्ये जाऊन पोहोचले. आमच्या शेतकऱ्यांमध्ये ती ताकद होती, ती शक्ती होती. पण ती कोणीतरी आठवण करून देण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने निसर्गाच्या लहरीपणामुळे कुठेतरी आमचा शेतकरी निराशेत गेला होता. मात्र, अभिनेता आमिर खान (Amir Khan) यांच्या वॉटर कपने त्या शेतकऱ्याला त्याच्यातील शक्तीची आठवण करून दिली. त्यामुळे एकेका गावामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी ती हनुमान उडी मारली आणि गाव जलस्वयंपूर्ण केले, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पाणी फाउंडेशन (Paani Foundation) बद्दल काढले.

पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२’ पुरस्कार सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी पाणी फाउंडेशनचे संस्थापक, अभिनेते आमिर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, अविनाश पोळ आदी उपस्थित होते.

Raj Thackeray यांचे आवाहन : राजकारणातील चिखल साफ करायला तरुण सरसावले!

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार सारखी योजना आपण सुरू केली. खरं तर ही योजना जनतेची योजना होती. शेतकऱ्यांची योजना होती. २० हजार गावांमध्ये आमच्या गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी इतके वेगवेगळे स्ट्रक्चर तयार केले आहे. त्यामुळे सहा लाख स्ट्रक्चर्स आमच्या या जलयुक्त शिवार योजनेमध्ये तयार झाले. परिणामी राज्यातील २० हजार गावे स्वयंपूर्ण झाली आहेत.

पाणी फाउंडेशन जे सातत्य दाखवलं त्याबद्दल मनापासून कौतुक करतो. पहिल्यांदा पाणी कप आणि वॉटर कप की ज्याच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गाव तयार करणे आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन विषमुक्त शेती शेतकऱ्यांचे गट तयार करणे हे जे काही काम पाणी फाउंडेशनने हातामध्ये घेतले आहे. खरोखर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोरच्या ज्या समस्या आहेत त्याची सोडवणूक कशी करता येईल. या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट मॉडेल या ठिकाणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तयार झाले आहे, असे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube