Maharashtra ZP Election : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार, 2 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदार होणार आहे तर निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यात होणारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग (Maharashtra Election Commission) जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीसाठी (Panchayat Samiti) होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra ZP Election) महसूल विभागात काही मोठे बदल करण्यात आले आहे. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल 112 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी पुढील आठ ते दहा दिवसांत बदलीच्या स्थानांवर हजर होणार असून त्यांच्या रुजू झाल्याचा दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात येत असल्याने राज्यात नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
New Zealand vs West Indies : न्यूझीलंडला मोठा धक्का, शतक झळकावणारा फलंदाज मालिकेतून बाहेर
जिल्हा परिषद निवडणुकीची संभाव्य तारीख
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याती 32 जिल्हा परिषद आणि 331 पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल 5 डिसेंबरपासून वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी देखील उमेदवार निवडण्याच्या कार्यक्रमाला गती दिल्याचे दिसून येत आहे.
