राज्य निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद; निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार?
Maharashtra Election Commission : राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची
          Maharashtra Election Commission : राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माहितीनुसार, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानुसार, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्यायचे आहे. यामुळे आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयोग (Maharashtra Election Commission) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करु शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या या पत्रकार परिषदे राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर होणार आहे. राज्यात 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यात 32 जिल्हा परिषद आणि 366 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची शक्यता आहे आणि तिसऱ्या टप्प्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात.
राज्य निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद#Maharashtra #MaharashtraPolitics #MaharashtraNews #ElectionCommission #Election2025 pic.twitter.com/CeRMTo2U2q
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 4, 2025
आज दुपारी चार वाजता होणारी पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) घेणार आहे. ते या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करणार आहे. आज दुपारी होणारी पत्रकार परिषद संपल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होणार असल्याची देखील सध्या समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता असल्याने आज पत्रकार परिषद संपल्यानंतर राज्यात आचारसहिता लागू होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधीपक्षांकडून मतदार यादीवरुन गंभीर निवडणूक आयोग आणि भाजपवर करण्यात येत आहे. आज दुपारी होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे काय उत्तर देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आधी मतदार यादी दुरुस्त करा आणि नंतर निवडणुका घेण्यात यावे अशी मागणी मनसेसह महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
अनिल अंबानींना धक्का, तब्बल 7,500 कोटींची संपत्ती जप्त; नेमकं प्रकरण काय?
