Download App

तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ना? सतेज पाटलांची भावनिक साद, दिले मोठे संकेत

MLA Satej Patil Emotional Message To Gokul Organization : मागील काही दिवसांपासून कोल्हापूरमधील (Kolhapur) राजकीय समीकरणं बदलली आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (Gokul Organization) अध्यक्ष निवडीमध्ये महायुतीची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. तर आगामी निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याच्या चर्चा होत आहेत. यादरम्यान आता, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ना? अशी भावनिक साद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या संस्था प्रतिनिधींना घातली आहे.

आताही एकटा आहे

गेली 20 ते 25 वर्ष मी राजकारणात आहे. शेवटी संघर्ष करावा लागतो. एखाद्या पंचवार्षिकला सगळे माझ्यासोबत असतात, एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतो. आताही एकटा आहे. तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत? असा सवाल देखील सतेज पाटील यांनी (Maharashtra Politics) केलाय. त्यामुळे या सगळ्या निवडणुका पहिलं जिल्हा परिषद आणि नंतर पंचायत समित्या उद्याच्या भविष्यात लढणार आहे. या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाणार आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आशीर्वाद राहू द्या, अशी विनंती सतेज पाटील यांनी केली आहे.

Fathers Day निमित्त स्वप्नीलने खास पोस्ट! बाबा लेकीचा सुपरहिरो अन् लेक बाबाचं सर्वस्व

‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर यांच्या येथील निवासस्थानी तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी सतेज पाटील बोलत होते. रेडेकर साहेबांचे आणि माझे संबंध चांगले होते. मामींनी आपल्या आयुष्य रेडेकर साहेब गेल्यानंतर स्वकर्तृत्वाने संस्था उभारली आहे. अनेकांना नोकरी लावलं, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तान नाही! आता सिंधू नदीचं पाणी ‘या’ राज्याला मिळणार, मोदी सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

‘गोकुळ’मध्ये एकटे पडल्याची कबुली

कोल्हापुर जिल्ह्यात महायुतीचे सर्व नेते एकत्र आले. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नवीद मुश्रीफ यांच्या हाती गोकुळची सर्व सुत्रं गेली. सतेज पाटील समर्थक निशिकांत पाटील- चुयेकर यांचे नाव मात्र मागे पडले. ‘गोकुळ’ची आगामी निवडणूक ही ‘महायुती’म्हणूनच लढविण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय. त्यामुळे ‘गोकुळ’च्या राजकारण सतेज पाटील एकटे पडल्याची चर्चा होती. याची कबुली स्वत: त्यांनीच यावेळी दिली आहे.

 

follow us