Satej Patil : ‘आता बंटीला बंटी झाले’; अजितदादांनी घेतली सतेज पाटलांची फिरकी
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि विनोदी स्वभावाच्या बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. अजितदादा बोलता बोलता कधी कुणाची फिरकी घेतील आणि हास्यकल्लोळ उडवतील याचा काही नेम नाही. आताही त्यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी कोल्हापुरातील काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.
या व्हिडिओत अजित पवार म्हणतात, की बंटीला आता बंटी म्हणणे बंद करा बंटीला आता बंटी झाले आहेत असा डायलॉग मारल्याने उपस्थितांत एकच हास्यकल्लोळ उडाला. यानंतर त्यांनी अनेक मुद्द्यावर आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डेंगळे यांच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी अजित पवार कोल्हापुरात आले होते.
Prakash Ambedkar : ‘म्हणूनच 2 हजारांच्या नोटबंदीचा निर्णय!’ : प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी सतेज पाटीलही उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. अजितदादांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.
अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढविला. तसेच कर्नाटकातील काँग्रेसच्या यशावरून भाजपला इशारा देत महाराष्ट्रातही कर्नाटकप्रमाणेच घडणार असल्याचे सांगितले. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निशाण्यावर घेतले. पोलीस खात्यात फडणवीस यांनी आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले तरच गुन्हेगारी थांबेल असे पवार यांनी सांगितले.
काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या मुद्द्यावर पवार म्हणाले. या दाव्यामध्ये काहीच तथ्य नाही. अशा बातम्या का पसरवल्या जातात हे समजत नाही. अशा बातम्यांमुळे काय पेट्रोल दरवाढ कमी होणार आहे का, गॅस सिलिंडरच्या किंमती कमी होणार आहेत का, महागाई कमी होणार आहे का, असे सवाल अजित पवार यांनी उपस्थित केले.