Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गचं काम गेल्या 13 वर्षांपासून पूर्ण होण्याची प्रतिक्षा नागरिक करत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या महामार्गाचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मार्गाची पाहणी देखील केली होती. त्यात आता हा महामार्ग कधी पूर्ण होणार? याची डेडलाईन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. (CM Eknath Shinde give Deadline for Starting Mumbai-Goa Highway Kokan Ganeshotsav )
‘राऊत सध्या व्हेंटिलेटरवर, 2024 ला व्हेंटिलेटरची वायरच खेचणार’ राणेंचं खोचक विधान
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
हा महामार्ग कधी पूर्ण होणार? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गणेशोत्सावाआधी या महामार्गाच्या एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार आहे. तर मुंबई-गोवा महामार्गासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याबद्दल माहिती देणारं ट्विट शिंदे यांनी केलं आहे.
चार फुटांवरील POP च्या गणेशमूर्तींना परवानगी, राज्य सरकारने आखले नवीन धोरण
काय आहे मुख्यमंत्र्यांचं ट्विट?
‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार आहे. मुंबई- सिंधुदुर्ग मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अठरा तासांचा प्रवास आठ ते दहा तासांवर आला आहे. शेतकरी,प्रवासी यासोबत उद्योग संधी विस्तारण्याच्या दृष्टीने हा उपयुक्त ठरत आहे. अशा विविध दळणवळण सुविधांच्या विस्ताराला शासनाने प्राधान्यक्रमावर घेतले असून कोकणातही या पद्धतीने दळणवळण सुविधांचा विस्तार करण्यात येईल.’ असं या ट्विटमध्ये मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार आहे.
मुंबई- सिंधुदुर्ग मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे… pic.twitter.com/vwDVRMRN4V— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2023
दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या 13 वर्षांपासून रखडलेलं आहे. रस्त्याची अवस्था बिकट आहे. खड्ड्यांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच विशेषतः कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सव काळात या महामार्गाच्या खराब अवस्थेचा प्रचंड त्रास होतो. तर या रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे.