‘राऊत सध्या व्हेंटिलेटरवर, 2024 ला व्हेंटिलेटरची वायरच खेचणार’ राणेंचं खोचक विधान
Nitesh Rane : खासदार विनायक राऊत सध्या व्हेंटिलेटरवर, 2024 ला व्हेंटिलेटरची वायर खेचणार असल्याचं खोचक विधान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाव न घेता केलं आहे. कोकणातील भाजप आमदार-ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये कायमच खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा नितेश राणेंच्या खोचक विधानाने राऊत-राणे जुंपणार असल्याची शक्यता आहे. (BJP MLa Nitesh Rane Critisize vinayak raut)
लाचखोर आयुक्त शैलजा दराडेला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, 44 जणांची कोट्यावधींची फसवणूक
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, खासदार विनायक राऊत काही महिन्यांसाठीच आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे आता आम्ही 2024 ला व्हेंटिलेटरची वायर खेचणार असल्याचा इशाराच नितेश राणे यांनी राऊतांना दिला आहे. तसेच राणे यांनी कोकणातल्या विकासकामांवरुनही राऊतांना डिवचलं असून आत्तापर्यंतचे खासदार कोकणासाठी काहीच करु शकलेले नाहीत, त्यामुळे आता आम्ही त्यांना राजकीय भावपूर्ण श्रद्धांजली देणार असल्याचीही टीका केली आहे.
ऐन पावसाळ्यात राजकारण तापणार; एका बाजूने शरद पवार तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस उतरणार मैदानात
मागील काही दिवसांपासून शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नितेश राणे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. ठाकरे गटातील नेत्यांच्या टीकेला राणेंकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जातं. त्यामुळेच नितेश राणे यांच्या प्रत्युत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असते.आत्ताही त्यांच्या खोचक विधानाने राजकारणात खळबळ उडवून टाकली आहे.
अधिवेशनातही त्यांनी लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधात आक्रमक भूमिका घेत कायदा करण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळेही ते चांगलेच चर्चेत आले होते. आता राणेंनी विनायक राऊतांवर खोचक विधान केल्याने सध्या त्यांच्या विधानाची चांगलीच चर्चा सुरु आहे. राणे यांच्या टीकेवर आता खासदार राऊत काय प्रत्युत्तर देणार? याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.