नारायण राणेंना कोर्टाचा दणका; नीलरत्न बंगल्यावर कारवाईचे आदेश

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यीतल मालवण – चिवला बीचवरील नीलरत्न बंगला (Neelratna Bungalow) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नारायण राणेंच्या नीलरत्न या अनधिकृत बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे जिल्हा कलेक्टर यांना दिले आहेत. त्यामुळे कोकणात राजकीय वातावरण तापले असून राणे आता […]

Untitled Design   2023 03 13T132311.748

Untitled Design 2023 03 13T132311.748

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यीतल मालवण – चिवला बीचवरील नीलरत्न बंगला (Neelratna Bungalow) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नारायण राणेंच्या नीलरत्न या अनधिकृत बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे जिल्हा कलेक्टर यांना दिले आहेत. त्यामुळे कोकणात राजकीय वातावरण तापले असून राणे आता अडचणीत आले आहेत. याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर माहिती दिली.

अधारे यांनी आपल्या फेसबुकपोस्टवर कोर्टीन आदेशाची प्रत पोस्ट करत या बांधाकामाविषयी माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, नारायण राणे यांनी समुद्राजवळच्या जमिनीवर, वन विभागाच्या जमिनीवर, अनेक अनधिकृत बांधकामे, बंगले, हॉटेल्सची उभारणी केली आहे. त्यापैकीच हा एक बंगला आहे. नाराणय राणेंचा मालवण-चिवला बीचवीरल अनधिकृत नीलरत्न बंगला (CRZ-2) सी. आर. झेड-2 चे उल्लंघन करून हा बंघला बांधण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, नारायण राणेंनी नीलरत्न बंगला अनधिकृत बांधल्याने आता मुंबई उच्च न्यायालयाने या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या बंगल्यावर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटूंबियांचा नीलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधतांनाी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेराव दिली होती. भालेराव यांनी यासंदर्भात रिट पिटीशन मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाने आता या अनधिकृत नीलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, नारायण राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला आहे.

WTC Final : भारताने रचला इतिहास! सलग दुसऱ्यांदा गाठली WTC फायनल

आता उच्च न्यायालयाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं हा नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे त्यामुळे आता नारायण राणे यावर काय भूमिका घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version