WTC Final : भारताने रचला इतिहास! सलग दुसऱ्यांदा गाठली WTC फायनल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (2)

India Qualifies WTC Final : भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंडने क्राइस्टचर्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळली गेलेली पहिली कसोटी जिंकून भारताला अंतिम फेरीत नेले आहे. अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी भारताला श्रीलंकेविरुद्धच्या दोनपैकी कोणत्याही कसोटीत पराभव किंवा अनिर्णित राहण्याची गरज होती. लंकन संघाचा पराभव करून न्यूझीलंडने भारताला मोठं गिफ्ट दिलं आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या निकालाचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या समीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही.

भारत सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. शेवटच्या वेळी 2021 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला होता. मात्र, आता न्युझीलंडने श्रीलंकेला परभूत करून भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यास मदत केली आहे. आता टीम इंडिया फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. सध्या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. ज्यामध्ये भारत 2-1 ने पुढे असून, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे.

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा नवा विक्रम

श्रीलंका-न्यूझीलंड सामन्यात काय घडलं?

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पहिल्या डावात 355 धावा केल्या. त्याचवेळी न्यूझीलंडने पहिल्या डावात 373 धावा केल्या. यानंतर पहिल्या डावात 18 धावांची आघाडी मिळाली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात 302 धावा करत न्यूझीलंडला दुसऱ्या डावात विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य दिले. त्यानंतर केन विल्यमसनच्या शतकी खेळीमुळे सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेचा शेवटच्या चेंडूवर पराभव झाला.

दुसरीकडे, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटचा सामना अत्यंत रोमांचकारी स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या दोन दिवशी सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने होता. मात्र, तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने चांगल्या फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले. चौथ्या दिवशी कोहलीच्या उत्कृष्ट शतकामुळे भारताने सामना पूर्णपणे ताब्यात घेतला आहे.

Tags

follow us