भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा नवा विक्रम
अहमदाबाद : कसोटीत भारतीय संघानं चौथ्या (India vs Australia 4th Test) दिवसाच्या खेळात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यात विराट कोहलीनं (Virat Kohli)शानदार 186 धावा केल्या. तर अक्षर पटेलनं (axar patel) अर्धशतकी (Half Century)खेळी करुन भारताला बळ दिलं आहे. या सामन्यात किंग कोहली व्यतिरिक्त केएस भरत (KS Bharat), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल यांनी अप्रतिम भागीदारी करून भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये (Indian Test Cricket)इतिहास (Record)रचला आहे.
पहिल्या डावात भारतीय संघानं 571 धावा केल्या, त्यामध्ये किंग कोहलीनं 186 धावांची तुफानी खेळी केली, तर शुभमन गिलनं 128 धावा केल्या. त्याचवेळी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघानं दुसऱ्या डावात 3 बाद 0 धावा केल्या होत्या.
शितल म्हात्रे म्हणाल्या, व्हिडीओ ‘मातोश्री’वरुन व्हायरल; ठाकरेंवर थेट आरोप
टीम इंडीयानं पहिल्या डावात आतापर्यंत सहा विकेट्स गमावल्या आहेत. परंतु सर्व फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली, परंतु कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं प्रथमच घडलं आहे की, 6 बाद 50 पेक्षा जास्त धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. पहिल्या 6 विकेटसाठी सर्व फलंदाजांमध्ये 50 धावांची भागीदारी झाली.
सर्वात आधी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात 74 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. दुसऱ्या विकेटसाठी शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात 113 धावांची अप्रतिम भागीदारी झाली. तिसऱ्या विकेटसाठी शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यात 58धावांची भागीदारी झाली. तर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यात चौथ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी पाहायला मिळाली.
विराट कोहली आणि केएस भरत यांच्यात पाचव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी झाली. तर विराट कोहली आणि अक्षर यांनी सहाव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली. यामध्ये सलग 6 वेळा 50 हून अधिक धावांची भागीदारी करून टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचून इतिहास रचला आहे.