शितल म्हात्रे म्हणाल्या, व्हिडीओ ‘मातोश्री’वरुन व्हायरल; ठाकरेंवर थेट आरोप

शितल म्हात्रे म्हणाल्या, व्हिडीओ ‘मातोश्री’वरुन व्हायरल; ठाकरेंवर थेट आरोप

मुंबई : मुंबईतील (Mumbai) शिंदे गटाच्या (Shinde Group)नेत्या शितल म्हात्रे (Shital Mhatre) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ (Viral Video)सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल करणाऱ्या दोन जणांना मुंबईमधील दहिसर पोलिसांनी गजाआड केलं आहे. त्यानंतर आज (दि.12) सायंकाळी शितल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद (Press Conference)घेत ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. म्हात्रे म्हणाल्या की, एखाद्या महिलेचं चारित्र्यहनन करणं किती सोपं असतं, याचा आम्ही सर्वजण याचा निषेध करतो. त्याबद्दल दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काल ज्यांना पकडलं आहे, त्यात ठाकरे गटातील (Thackeray Group)दोन नेत्यांना पकडलं आहे. त्यात एक उपविभागप्रमुख आहे, त्याचप्रमाणे एक युवासेनेचा (Yuvasena)शाखाप्रमुख आहे. ज्यांना पकडलं जातंय ते सर्व ठाकरे गटाचे आहेत. मला अशी माहिती मिळाली आहे की, ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून या गोष्टी व्हायरल करा अशा सूचना येत होत्या, माझा एक व्हीडिओ शेअर केला. त्यावर एक वाह्यात पद्धतीचं गाणं टाकलं. त्यावर घाणेरडा मेसेज टाकून मातोश्री या फेसबुक पेजवरुन व्हायरल करण्यात आलं, असा आरोपही यावेळी शितल म्हात्रे यांनी केला.

त्याचवेळी शितल म्हात्रे म्हणाल्या की, तत्कालीन आमदार घोसाळकर यांनी असाच त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या विरोधात मी उभी राहिले होते. मी हॉस्पीटलमध्ये अॅडमीट होते. त्यावेळी मी खूप त्रास सहन केला. पॉलिटीकल, मानसिक, शारिरीक त्रास सहन केला मात्र त्याच्यापुढे झुकलो नाही. त्यावेळी उद्धव ठाकरेंकडं आम्ही अनेकदा विनंती केली की, तुम्ही आमचं ऐका, त्यावेळी माझ्याबरोबर आमदार मनिषा चौधरी होत्या. माजी महापौर डॉ. शुभा राऊळ होत्या. आम्ही तिघीजणी उद्धव ठाकरेंकडं आर्जव करत होतो. आमचं ऐकून घ्या. त्यांनी ते ऐकलं नाही.

Nashik Long March : शेतकरी, कष्टकरी मुंबईत धडकणार; वीजबिल माफी, वनजमिनींच्या हक्कासाठी सरकारला घेरणार

आज आम्हाला सुखद धक्का बसला की, हे जेव्हा घडलं तेव्हा पहिला फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आला. मला म्हणाले की घाबरु नकोस हा भाऊ तुझ्यापाठीमागं पहाडासारखा उभा आहे. तीथं आम्हाला आर्जव करुन मिळत नव्हतं आणि इथं मागायच्या आधीच आम्हाला गोष्टी मिळत गेल्या असाही टोला यावेळी शितल म्हात्रे यांनी लगावला आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आले. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला लागली. हे करत असताना अनेक अडचणी आल्या. अगदी वेळप्रसंगी स्वतःच्या जीवावरही बेतलं. परंतु स्वतःचा आत्मसन्मान वाचवताना तेही केलं. त्याच्यानंतर एक निर्णय घेण्याची वेळ आली.

ज्या बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला होता, तोच विचार घेऊन जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे निघाले, तेव्हा त्यांच्याबरोबर असणं आवश्यक वाटलं. त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्हा महिलांना अत्यंत वाईट पद्धतीनं बोलणं सुरु झालं. आपण जर बघाल आम्ही आठ ते नऊ महिने अनेक पद्धतीनं ट्रोलींगला सामोरं जातो आहोत.

आम्ही अनेक पद्धतीनं फेसबुक, ट्वीटरवर, इन्टाग्रामवर अतिशय वाईट पद्धतीनं बोललं जात आहे. त्यांच्याकडं दुर्लक्ष करुन आम्ही आमच्या कामाकडं लक्ष दिलं. महाराष्ट्राच्या जनतेला कशा पद्धतीनं प्रगतीपथावर न्यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्यातच काल मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागाठाण येथे प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमासाठी आले असताना तेथे एक व्हीडिओ केला.

त्याच्यावर एक वाह्यात पद्धतीचं गाणं टाकला. त्यावर घाणेरडा मेसेज टाकून मातोश्री या फेसबुक पेजवर व्हायरल करण्यात आलं. सांगायला दुःख वाटतंय की, एका तासात ते जवळजवळ 350 वेळा शेअर करण्यात आलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या जवळजवळ सर्वच पदाधिकारी आणि ठाकरे गटाचे सर्वच पेजेसवर ते व्हायरल करण्यात आलं.

एखाद्या स्त्रीच्या विरोधात बोलायला काहीच नसेल तर तीचं चारित्र्यहनन करणं किती सोपं असतं. तीला ज्या पद्धतीनं स्त्री काम करत असते, कुठेतरी तीच्याबद्दल तुमच्याकडं बोलण्यासारखं काही नसेल तर अशा पद्धतीनं कटकारस्थान केलं जातं, असंही यावेळी शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रेंनी म्हटलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube