Nashik Long March : शेतकरी, कष्टकरी मुंबईत धडकणार; वीजबिल माफी, वनजमिनींच्या हक्कासाठी सरकारला घेरणार

Nashik Long March : शेतकरी, कष्टकरी मुंबईत धडकणार; वीजबिल माफी, वनजमिनींच्या हक्कासाठी सरकारला घेरणार

Nashik Long March : शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक (Nashik Long March) येथून राजधानी मुंबईत मोर्चा धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि अन्य समविचारी संघटनांच्या नेतृत्वात लाँग मार्च काढण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून या मोर्चाला सुरुवात झाली असून येत्या 21 मार्च रोजी हा मार्च मुंबईत दाखल होईल.

राज ठाकरेंची आम्हाला गरज नाही, रामदास आठवलेंनी काढला चिमटा

हा मोर्चा नाशिक येथे पोहोचणार आहे. या मोर्चात शेतकरी जवळपास आठ दिवसांचा पायी प्रवास करत मुंबईला पोहोचतील. शेतमालाची सध्याची परिस्थिती, कवडीमोल मिळत असलेले भाव आणि हक्काच्या वनजमिनींसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या मोर्चात काही महत्वाच्या मागण्या केल्या जाणार आहेत. त्यामध्ये कांद्याला 6 हजार रुपये अनुदान द्या, कांदा निर्यातीच्या शक्यता तपासून कांदा निर्यात सुरू करा, किमान दोन हजार रुपये दराने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करा. कसणाऱ्यांच्या ताब्यात असणारी चार हेक्टरपर्यंतची वनजमीन कसणाऱ्यांच्या नावे करून सातबाराच्या कब्जेदारी सदरी कसणाऱ्यांचे नावे लावा, या महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

अंधारेंचा गंभीर आरोप, सदानंद कदमांवरील कारवाईमागे एक लाख एक टक्के रामदास कदम

शेतकऱ्यांना दिवसा सलग बारा तास वीज मिळावी, शेतकऱ्यांची थकीच बिले माफ करावीत तसेच शेतीविषयक कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, यांसह अन्य बऱ्याच मागण्या करण्यात आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube