राज ठाकरेंची आम्हाला गरज नाही, रामदास आठवलेंनी काढला चिमटा
अहमदनगर : भाजप-शिवसेना-आरपीआय युतीला राज ठाकरेंची गरज नसल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना चिमटा काढला आहे. नूकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन पार पडला. ठाण्यात मोठं शक्तीप्रदर्शन करीत राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखणं सुरु केल्याचं यावेळी दिसून आलं. ठाकरेंच्या सभांवरही रामदास आठवलेंनी यावेळी टीका केलीय.
आठवले पुन्हा शिर्डीतून उभे राहणार? शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
राज ठाकरेंनी सभेत बोलताना राज्यातील सर्वच सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र सोडले होते. ठाकरेंच्या या टिकांना रामदास आठवलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. आठवले म्हणाले, राज ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत.
राज ठाकरे जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटत असले, तरी त्यांची आम्हाला गरज नाही. आम्ही तिघे जण एकत्र आहोत. राज ठाकरे यांनी आपलं वैयक्तिक राजकारण करावं असा सल्लाही आठवले यांनी ठाकरेंना दिला आहे.
आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणारे दोघे गजाआड; उद्या शेवगाव बंदची हाक
तसेच आगामी निवडणुकामध्ये राज ठाकरेंनी सत्तेत येणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. पण मुंबईत सत्ता आणण्याची राज ठाकरेंमध्ये ताकद नसल्याचं रामदास आठवलेंनी ठामपणे सांगितलं आहे.
आगामी निवडणुकीत राज ठाकरे यांच्या चार ते पाच जागा निवडून येऊ शकतात, असं भाकीतही आठवलेंनी यावेळी केलं आहे. सल्ला देताना आठवलेंनी राज ठाकरेंना चिमटाही काढला आहे. राज ठाकरेंच्या राज्यभरात मोठ्या गर्दीत सभा होत असतात पण त्यांचे उमेदवार निवडून येत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे आणि रामदास आठवले यांचं वाकयुद्ध कायमच चर्चेत राहिलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे भाजप-शिवसेनेशी युती करणार का? हे अद्याप गुलदस्त्यात असून रामदास आठवलेंच्या या वक्तव्यावर आता राज ठाकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचं उत्सुक्याचं ठरणार आहे.