Download App

Raigad : स्थगिती उठली, निधीही मंजूर, कामे मार्गी : आदिती तटकरेंची मतदारसंघात जोरदार बॅटिंग

Funds approved in the budget for many development works in Aditi Tatkare's constituency | आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील अनेक विकासकामांना अर्थसंकल्पात निधी मंजूर

रायगड : राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या मतदारसंघातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर अनेक विकासकामांवरील स्थगिती उठली आहे. शिवाय अर्थसंकल्पात मोठा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कामे मार्गी लावण्याचा धडाकाही सुरू झाला आहे. मात्र या चित्रामुळे रायगडमधील शिवसेना आमदारांच्या गोटात अस्वस्थता पसरत चाल्याचे चित्र आहे. (Funds approved in the budget for many development works in Aditi Tatkare’s constituency)

मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी पुन्हा जुना सूर आळवायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. अजितदादा निधी देत नाहीत, आमची फाईल पुढे सरकवत नाहीत, अशा तक्रारी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहेत. निवडणुका जवळ आल्या आहेत. अशावेळी मतदारसंघात निधीच नसेल तर विकासकामे कशी करणार?

अजितदादांचे इजा, बिजा, तिजा… : नाराजी लक्षात येताच शिंदे-फडणवीस दिल्लीला रवाना

त्याचवेळी राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या मतदारसंघात बंपर निधी मिळत आहे, स्थगिती मिळालेली कामे पुन्हा सुरु झाली आहेत, शिवसेनेचाच मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला फायदा होत नसल्याच्या या तक्रारी शिंदेंच्या कानावर घातल्या जात आहेत. त्याचवेळी आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात कामे मार्गी लावण्याचा धडाका सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकांचं बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान…

कोणती कामे लागली मार्गी?

माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल उभारणीच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. याशिवाय तळा येथील खारभूमी संशोधन केंद्र, श्रीवर्धनमधील सुपारी संशोधन केंद्र, रोहामधील काढणी पश्चात तंत्रज्ञान महाविद्यालयाचे श्रेणी वर्धन करण्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. रोहा तालुक्यातील जामगाव येथील चिंतामणराव देशमुख जैव विविधता केंद्र उभारण्यासाठीची फाईलही मंत्रालय स्तरावरुन पुढे सरकत आहे. एवढेच नव्हे तर पुरवणी अर्थसंकल्पातही आदिती तटकरे यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी 147 कोटींच्या कामांसाठी निधी मंजूर करून घेतला आहे.

Tags

follow us